Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

चांगला Credit Score मिळवायचाय, तर या सोप्या गोष्टी नक्की करा

Credit score

क्रेडिट स्कोअर (Credit Score) तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करू शकतो. स्कोअर खालावला असेल तर कार, तारण (Mortgage) असे कोणतेही कर्ज घेणे कठीण होऊन बसते. समजा कर्ज मिळालेच तर अधिक व्याजदर द्यावा लागेल. यामुळे आपला क्रेडीट स्कोअर चांगला ठेवणे किंवा तो सुधारणे खूप गरजेचे आहे. मग हे स्कोअर कसे वाढवायचे ते पुढे वाचा.

Improve Credit Score क्रेडिट स्कोअर (credit score) हे क्रेडिट कार्ड धारक व्यक्तीच्या संपूर्ण क्रेडिट फाईलचा लेखाजोखा समजून त्याला एक स्कोअर दिला जातो. हा स्कोअर म्हणजे एक संख्यात्मक श्रेणी असते. ही श्रेणी त्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता असते. आपल्याला अनेकदा सांगितले जाते की उच्च क्रेडिट स्कोअर राखणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण यामुळे विविध आर्थिक सेवांचा लाभ घेता येतो. खरेतर, चांगला क्रेडिट स्कोअर हा सन्मानाच्या बिल्ल्यासारखा (badge of honor) असतो. चांगला क्रेडीट स्कोअर राखणे कठीण असते, मात्र आपण चांगली क्रेडिट पार्श्वभूमी मिळवून स्कोअर वाढवण्यासाठी काही मार्ग शोधत असाल, तर हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल.                 

 क्रेडिट स्कोअर सुधारण्याच्या सोप्या पद्धती (Ways to enhance credit score) -                  

  • क्रेडिट रिपोर्ट तपासा: क्रेडिट स्कोअर रिपोर्टमध्ये आधी परतफेड केलेल्या कर्जाबाबतची माहिती नमूद केलेली नसते. या गोष्टीचा क्रेडिट स्कोअरवर काही अंशी परिणाम होतो, त्यामुळे अशा त्रुटी शोधण्यासाठी तुमच्या अहवाल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. रिपोर्टमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा माहिती गाळलेली आढळल्यास योग्य ती माहिती तेथे अपडेट करा.                   
  • कर्ज वेळेत फेडणे: कर्ज वेळेच्या फेडणे गरजेचे आहे. देय रक्कमेसाठी योग्य नियोजन केल्यास ही रक्कम फेडणे सोप्पे होईल. या गोष्टीची सवय लागल्यास क्रेडिट स्कोअर आपोआप सुधारेल. यामुळे भविष्यात नवीन क्रेडिट मिळवण्यासाठी आणि क्रे़डीटची मर्यादा आणखी वाढवण्यासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरची मदत होईल. त्यात वेळेत कर्ज फेडणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.                   
  • दिर्घकालीन कर्जाची निवड करा: कर्ज घेतल्या ते परतफेड करण्याच्या मुदतीबाबत साशंक असल्यास, आपण दीर्घकालीन कालावधी निवडणे फायद्याचे ठरेल. यामुळे मासिक हफ्त्यांची रक्कम कमी होईल, यामुळे आपण डिफॉल्टमध्ये जाणार नाही. तसेच तुम्ही विशिष्ट कालावधीनंतर मोठी रक्कम भरून कर्जाची रक्कम कमी करू शकता किंवा कर्ज पूर्ण फेडू शकता.                   
  • मौल्यवान क्रेडिट कार्ड: क्रेडिट कार्ड जुने झाले आहे बदलुया असे वाटत असल्यास, आधी थांबा. आपल्या क्रेडीट कार्डचा इतिहास सकारात्मक असल्यास, बँक आपल्याला जबाबदार व्यक्तींच्या कॅटगरीत ठेवले. याचाच अर्थ, आपला क्रेडिट स्कोअर सुधारेल. यामुळे जुने क्रेडिट कार्ड बदलू नका किंवा नवे घेतल्यास जुने टाकू नका, असा सल्ला नॅशनल फाऊंडेशन फॉर क्रेडिट काउंसिलिंगचे प्रवक्ते ब्रूस मॅकक्लेरी यांनी सिएनबीसी सिलेक्टला माहिती देताना सांगितले.        


हा सराव तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यात मदत करेल जो भविष्यातील क्रेडिट मिळवण्यासाठी आणि तुमची क्रेडिट मर्यादा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. या क्रेडीट स्कोअर वाढवण्याच्या सर्व पद्धती महामनीच्या वाचकांसाठी खास आर्थिक सल्लागार रोहित कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.