Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Freedom: वयाच्या चाळीसाव्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य कसे व्हाल, जाणून घ्या!

Financial Freedom at the age of 40

Financial Freedom: आपल्या प्रत्येकाची जीवनशैली, जबाबदाऱ्या आणि ध्येय यावर आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या ठरत असते. तसेच ती व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे बदलत देखील असते. आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हायचे असल्यास सर्वांत प्रथम आपले अनिवार्य आणि ऐच्छिक खर्च लक्षात घेणे जरुरीचे आहे.

"Life really does begin at forty. Up until then, you are just doing research". अर्थात खरे आयुष्य चाळीशीनंतर सुरू होते, तोवर आपण फक्त स्वतःला शोधत असतो. आपल्यापैकी बहुतेक जणांनी चाळीशीपर्यंत आयुष्याच्या चेकबॉक्स-लिस्टपैकी बहुतेक चेकबॉक्ससमोर "टिक-मार्क" केलेल्या असतील. करिअर समाधानकारकपणे निश्चित मार्गाला लागलेले असते. सहजीवनाचा जोडीदार मिळून "ये तेरा घर.. ये मेरा घर.." संसार सुरू झालेला असतो. त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब देखील तयार झालेले असते. मुलांचे शिक्षण, भविष्यातील त्यांचे संभाव्य करिअर-चॉइसेस लक्षात घेता आर्थिक आघाडी भक्कम केली जाऊ लागली असते. आपत्कालीन परिस्थितीसाठी इमर्जन्सी फंडचा देखील बंदोबस्त करून ठेवायला सुरुवात केली असते. शक्य झालेच, तर अर्ली-रिटायरमेंटचे विचार देखील खुणावत असतील. म्हणजे आता दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला आर्थिक स्वातंत्र्याचा म्हणजे फायनान्शिअल फ्रीडमचा चेकबॉक्स टिक-मार्कसाठी समोर आलेला असतो.

वयाच्या 40 व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी खालीलप्रमाणे काही पावले उचलू शकतो,  

आर्थिक स्वातंत्र्याची स्वतःची डेफिनिशन निश्चित करणे 

ही सर्वांत पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. आपल्या प्रत्येकाची जीवनशैली, जबाबदाऱ्या आणि ध्येय यावर आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या ठरत असते. तसेच ती व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे बदलत देखील असते. आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हायचे असल्यास सर्वांत प्रथम आपले अनिवार्य आणि ऐच्छिक खर्च  लक्षात घेणे जरुरीचे आहे. त्यानुसार आपल्याला सध्या जगत असलेली लाईफस्टाईल भविष्यातही कायम ठेवण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा अंदाज येऊ शकेल. अर्थातच, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचा “one-size-fits-all” निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नाही. तरीदेखील, केवळ guess-work करण्यापेक्षा निश्चित मिळत राहील अशा आर्थिक स्रोताचे कॅल्क्युलेटेड फ्रेमवर्क जास्तीत जास्त अपेक्षित लाईफ-गोल्स (Life Goals) साध्य करता येऊ शकतील.

पुरेसा लाईफ इन्सुरन्स कव्हर घेणे

आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच आपल्याला आपल्या कुटुंबाच्याही आर्थिक भविष्यासाठी पर्याप्त नियोजन करून ठेवावे लागेल. यापुढील आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या निश्चितच वाढल्या असतील. कारण आपल्या 40 च्या दशकामध्ये, आपली मुले, जोडीदार आणि पालकांसह अनेक व्यक्ती त्यांच्या विविध गरजांसहित अवलंबून असू शकतात. तेव्हा एखाद्या दुर्दैवी क्षणी, आपल्या पश्चात आपण घेऊन ठेवलेली टर्म इन्शुरन्स पॉलिसीच आपल्या कुटुंबाचे किमान आर्थिक संरक्षण करू शकेल. जर आपण अधिक सजग राहून आधीच लाईफ इन्शुरन्स घेतला असेल, तर उत्तमच. मग आता नियमित वेगाने बदलत्या लाईफस्टाईलनुसार आपल्या कुटुंबाचा निर्वाह होत राहिल आणि वाढत्या महागाईसोबत दोन हात करता येतील, असे वाढीव लाईफ कव्हर घेण्याची संधी आपण साधली पाहिजे. तेव्हा इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो, सॉल्व्हेंसी रेशो, प्रीमियमचे कॉम्पिटिटिव्ह रेट्स आणि ॲक्सिडेंट रायडर्स, WOP रायडर्स सारख्या पर्यायांचा अभ्यास करून ॲडिशनल लाईफ कव्हर घेणे, अनिवार्य असेल.

गंभीर आजारासाठी क्रिटिकल इलनेस कव्हर घेणे

CoviD-19 काळामध्ये दुथडी भरलेली हॉस्पिटल्स, मेडिकल इमर्जन्सी, ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि त्यासाठी केलेली धावपळ आजदेखील बहुतेक लोकांच्या स्मरणांत असेल. अनाकलनीय अशा अदृश्य आघाताने कित्येकांची आयुष्यभराची आर्थिक पुंजी एका रात्रीमध्ये संपवली. केवळ लाईफ इन्शुरन्स घेऊन पर्याप्त आर्थिक स्थिती साधता येत नाही, याची प्रखर जाणीव झाली. तेव्हा चाळिशीनंतरच्या स्वातंत्र्याचा विचार करीत असू, तर जास्तीत जास्त गंभीर आजार कव्हर करणारे क्रिटिकल इलनेस कव्हर घेणे, अनिवार्य आहे. काही इन्शुरन्स कंपनीज् सर्वसमावेशक संरक्षण धोरण म्हणजे थोडक्यात ऑल इन वन पॉलिसीज् डिझाईन करतात. ज्यामध्ये मृत्यू आणि गंभीर आजार दोन्ही समाविष्ट आहेत, अशा पॉलिसीची आपण निवड करू शकतो. ज्या पॉलिसीमुळे आपल्याला कव्हर केलेल्या कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास (Diagnosis) एकरकमी पे-आउट मिळेल आणि भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ होतील, अशा पॉलिसीची निवड केल्यास अधिक संयुक्तिक ठरेल.

कर्ज आणि क्रेडिट कार्ड नियंत्रणात ठेवणे 

चाळीशीची गोष्ट असल्याने साधारणपणे आपल्यापैकी बहुतेक जणांनी लहानपणापासून पाहिलेले स्वतःच्या प्रशस्त घराचे स्वप्न साध्य होण्याच्या उंबरठ्यावर आलेले असते. अशावेळी बरेचदा होम लोन आणि त्यावर द्यावे लागणारे व्याज (Interest) आपल्या चाळिशीनंतरच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या कल्पनेवर मर्यादा आणू शकते. होम लोनच्या समोर एक मौल्यवान मालमत्ता होत असली, तरीदेखील लवकरात लवकर कर्ज मुक्त होण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. असे करत असताना स्थिर असा पर्यायी आर्थिक स्रोत निर्माण करणे, आपले पहिले कर्तव्य असेल. मात्र यावेळी अनाठायी खर्च, विशेषतः आपल्या क्रेडिट कार्डच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

विश्वास ठेवा, Fearing 40s चे रूपांतर Festive 40s  मध्ये करता येणे सहज शक्य आहे. यासाठी गरज आहे फक्त, इच्छाशक्तीची आणि उत्तम नियोजनाची. मग आपण देखील म्हणू शकतो, I am not 40. I am just 18 with 22 Year's Experience.