Nirmala Sitharaman Budget: 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विविध क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराच्या महाराष्ट्र राज्याला काय मिळाले आहेत, हे जाणून घेवुयात.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?(What did Maharashtra Get in the Budget)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, महाराष्ट्राला या अर्थसंकल्पचा मोठा फायदा झाला आहे. या राज्यासाठी सहकार क्षेत्रासंबंधित महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा कृषी पतसंस्थांना देण्यात आला आहे. या घोषणेमुळे या संस्थांना आता कोल्ड स्टोरेजपासून ते पेट्रोल पंप चालवण्यापर्यंतचे व्यवसायात काम करता येणार आहे. यामुळे या भागात राहणाऱ्या स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच एक कोटी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा जो लाभ आहे, त्यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचादेखील समावेश होईन. 2016 पूर्वी कारखान्यांनी जो खर्च एफआरपीसाठी केला आहे, तो खर्च हा कर सवलतीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 10 हजार कोटींचा कर भरावा लागणार नसल्याने, त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्राकडून (Highest GST to the Country from Maharashtra)
देशाला सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्र या राज्याकडून मिळते. भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्र राज्याचा अधिक वाटा असतो. एकूण जीडीपीच्या तुलनेत हे राज्य सर्वाधिक 38.3 टक्के इतका थेट कर भरतो. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे 15 टक्के जीएसटी हा महाराष्ट्र राज्यातून गोळा होतो.