Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022 Stunning Stadiums In Qatar: कतारने नव्याने बांधली भव्य स्टेडियम्स, अब्जावधी डॉलर्स केले खर्च

FIFA World Cup 2022, FIFA World Cup Qatar 2022, Qatar Economy

Image Source : www.twitter.com

FIFA World Cup 2022 In Qatar 8 Stunning Stadiums : कतारमध्ये फिफा विश्वचक स्पर्धेची सुरुवात झालेय. 8 स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत. यापैकी 7 स्टेडियम तर पूर्णपणे नव्याने बांधण्यात आली आहेत. जाणून घेऊया कोणती आहेत ही 8 स्टेडियम ज्यावर फिफा वर्ल्डकप 2022 रंगणार आहे.

कतारमध्ये फिफा विश्वचक स्पर्धेची सुरुवात झालेय. 8 स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत. यापैकी 7 स्टेडियम तर पूर्णपणे नव्याने बांधण्यात आली आहेत. स्पर्धेपूर्वी स्टेडियमवर तब्बल 6,5 ते 10 बिलियन डॉलर इतका अंदाजित खर्च करण्यात आला आहे. जाणून घेऊया कोणती आहेत ही 8 स्टेडियम ज्यावर फिफा वर्ल्डकप 2022 रंगणार आहे.

लुसेल स्टेडियम (Lusail Stadium)

लुसेल स्टेडियम हे दोहा येथे आहे. हे या स्पर्धेतील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या मैदानावरच फुटबॉलचा जगज्जेता कोण याचा फैसला होणार आहे. 18 डिसेंबरला हा अंतिम सामना रंगणार आहे. यावेळी प्रेक्षकांना हीटचा त्रास होऊ नये यासाठी मोठा खर्च करून यंत्रणा बसवण्यात आली आहे. 40 हजार इतक्या प्रेक्षक क्षमतेचे हे मैदान आहे. स्पर्धेपूर्वी सुमारे 5 वर्ष आधीपासून या स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. आर्किटेक्ट झाहा हदीद यांनी या स्टेडियमची रचना केली आहे.

अल बायत स्टेडियम (Al Bayt Stadium)

या भव्य स्पर्धेच्या समारंभ सोहळ्याचा मान या स्टेडियमला मिळाला. उद्घाटनाचा सामनाही अल बायत स्टेडियमवर खेळवण्यात आला. लुसेल नंतर हे सर्वात मोठे स्टेडियम आहे. 30 नोव्हेंबर 2021 रोजी हे स्टेडियम खुले करण्यात आले होते. या स्टेडियमची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते तंबूप्रमाणे बांधण्यात आले आहे.  आखाती देशातील भटके लोक अशा प्रकारचा तंबू वापरतात.

एज्युकेशन सिटी स्टेडियम (Education City Stadium in Al Rayyan)

एज्युकेशन सिटी स्टेडियम हे आणखी एक स्टेडियम ज्यावर फिफाचे सामने खेळवले जाणार आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगामध्ये सर्वाधिक ईको फ्रेंडली स्टेडियम मानले जाते. कतारमधील शैक्षणिक संस्था याचा वापर करतात. आता मात्र महिनाभर यावर फूटबॉलचे सामने रंगणार आहेत. यानंतर पुन्हा शैक्षणिक संस्थाकंडे ते वापरासाठी देण्यात येणार आहे.

अल थुमामा स्टेडियम (Al Thumama Stadium in Doha)

कतारमध्ये फिफा विश्व चषकाच्या निमित्ताने बांधण्यात आलेल्या प्रत्येक स्टेडियमचे काही ना काही वैशिष्ट्य दिसते. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे मध्य पूर्व देशातील पुरुष आणि मुलांनी परिधान केलेल्या पारंपरिक तकिया हेडकॅप्सपासून प्रेरणा घेऊन या मैदानाची रचणणा करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचे काही सामने अल थुमामा स्टेडियमवर होणार आहेत.

स्टेडियम 974 (Stadium 974 in Doha )

या स्टेडियमचे नाव असे काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. स्टेडियमच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या शिपिंग कंटेनरची संख्या आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय डायलिंग कोडवरून स्टेडियम 974 हे नाव ठेवण्यात आले आहे. फिफा वर्ल्डकपसाठी पाच वर्ष अगोदर म्हणजे 2017 मध्येच या स्टेडियमचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.

अहमद बिन अली स्टेडियम  (Ahmad Bin Ali Stadium in Al Rayyan)

अहमद  बिन अली स्टेडियम हे कतारमधील जुने स्टेडियम आहे. 2003 साली ते बांधण्यात आले होते. अमेरिका, वेल्स, बेल्जियम, कॅनडा, इराण, जपान, कोस्टा रिका, इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्या गट फेरीतील सामने या मैदानावर रंगणार आहेत. 44 हजार 740 इतकी या मैदानाची प्रेक्षक क्षमता आहे.

खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Khalifa International Stadium in Al Rayyan)

हे अहमद बिन अली स्टेडियमपेक्षाही जुने असे मैदान आहे. ते 1976 साली बांधण्यात आले होते. 2017 मध्ये याचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. कतारचे माजी खलिफा बिन हमाद अल थानी यांच्या नावावरून या मैदानाला खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे नाव दिले गेले आहे.

अल जानूब स्टेडियम (Al Janoub Stadium)

40 हजार प्रेक्षक क्षमतेच हे मैदान आहे. या मैदानावर देखील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील काही सामने खेळवले जाणार आहेत. ही सर्व मैदाने एकमेकांपासून एक ते दीड तास अंतराच्या अंत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्रवासासाठी ही मैदाने सोयीची ठरणार आहेत.