गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची वाट बघत आहेत. पावसाळा सुरु झालाय, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. बी-बियाणे, खत, रासायनिक औषधे यासाठी शेतकऱ्यांना पैशाची निकड भासते आहे. त्यामुळेच PM किसान योजनेचा 14 वा हफ्ता कधी मिळणार याबाबद शेतकरी वारंवार विचारणा करत आहेत.
अशातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 14व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. शासकीय आणि मंत्रालयीन पातळीवर याबाबत प्रक्रिया पूर्ण झाली असून, या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम अदा केली जाणार आहे.
Farmers Pay Attention! ?
— PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI (PM-KISAN) (@pmkisanofficial) June 27, 2023
Follow the below mentioned advisory to avail your benefits of the 14th Installment of PM Kisan Samman Nidhi Yojana.#PMKisan #PMKisanSammanNidhiYojana #Farmers #14thInstallment pic.twitter.com/GMR7w0ScUC
याबाबत, सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र पेरणी, बी-बियाणे यांच्या खरेदीसाठी लगबग सुरु झालेली असताना सरकारी पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याबाबत लवकरच सरकारतर्फे आणि कृषी विभागातर्फे देखील घोषणा केली जाईल असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचे आर्थसहाय्य दिले जाते. एकूण तीन हफ्त्यात प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाते. केंद्र सरकार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत असते. सध्या शेतकरी 14 व्या हफ्त्याची वाट बघत आहेत. तेरावा हफ्ता 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. यावेळी 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 16,800 कोटी रुपयांची सन्मान निधी देण्यात आला होता.
केवायसी आवश्यक!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे केवायसी होणे गरजेचे आहे. तेराव्या हफ्त्याच्या वेळी KYC अपडेट नसलेल्या लाखो शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले होते. यावेळी सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना लाभ देण्यात येणार नाहीये. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी, जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी PM-किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606 वर कॉल करून शेतकरी आवश्यक ती माहिती मिळवू शकतात.