Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Notes: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मिळणार मुदतवाढ? जाणून घ्या डीटेल्स

2000 Notes

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या 93% नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अजून 7% नोटा चलनात असून त्याचे मूल्य 0.24 लाख कोटी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. 1000 आणि 500 च्या नोटबंदीचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला होता, मात्र 2000 च्या नोटा बँकांमध्ये बदलून घेण्यास आणि जमा करण्यास नागरिकांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे/ येत्या 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक त्यांच्याकडील 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा आकारू शकणार आहेत.

30 सप्टेंबर नंतर काय?

2 हजारांच्या नोटेबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि स्वतः गवर्नर शक्तीकांत दास यांनी वेळोवेळी माहिती दिली आहे. 2 हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या जाणार असल्या तरी चलन म्हणून त्याची वैधानिक मान्यता कायम असेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय जरी केल्यानंतरही बाजारात या नोटांच्या माध्यमातून व्यवहार केले जात होते. मात्र 30 सप्टेंबर ही तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतशी या नोटांची आवक बँकांमध्ये देखील वाढू लागली आहे.

30 सप्टेंबर 2023 नंतर ज्या नोटा बँकांमध्ये जमा होणार नाही, त्या नोटांचे काय होणार हे रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेलं नाही.

मुदतवाढ मिळणार?

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या 93% नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अजून 7% नोटा चलनात असून त्याचे मूल्य 0.24 लाख कोटी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

30 सप्टेंबरपर्यंत उरलेल्या नोटा बँकांमध्ये जमा होतील असा विश्वास आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र 30 सप्टेंबरनंतर 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. अजून तसे कुठलेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही. आज उद्यात यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे.

2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यास आणि जमा करण्यास 1 महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.