• 05 Feb, 2023 12:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad: शाहरूखचा पठाण परदेशात सुपरहीट, आॅस्ट्रेलियात पहिल्याच दिवशी 3 हजार तिकिटे बुक

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad

Image Source : http://www.india.postsen.com/

Pathan Movie: शाहरूख खान व दिपिका पदुकोनचा 'पठाण' चित्रपट भारतात 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाची परदेशात तिकिट विक्री तुफान सुरू आहे. या चित्रपटाने परदेशात धुमाकूळ घातला आहे.अॅडव्हान्स बुकिंगबाबत पठाण चित्रपटाने केजीएफचादेखील रेकाॅर्ड तोडला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Pathan Movie Advance Booking: किंग खान (King Khan)चा पठाण (Pathan) चित्रपट भारतासह परदेशातदेखील धमाल करीत आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग (Advance Booking) मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. भारतात हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र परदेशात हा चित्रपट पाहण्यासाठी बाॅक्स आॅफिसला तिकीट काढण्यासाठी फुल्ल गर्दी झाली आहे. चला, तर मग या चित्रपटाच्या बुकींगसंबंधी जाणून घेवुयात. 

अॅडव्हान्स बुकिंग जोरदार (Advance Booking Fast)

भारतात तर प्रर्दशनापूर्वीच पठाण या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र परदेशातदेखील पठाणची क्रेझ दिसत आहे. कारण परदेशात पठाण या चित्रपटाचे शो ची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. यूएई, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंगला तुफान गर्दी आहे. पिंकविलाच्या माहितीनुसार, यूएई देशात पहिल्या दिवशी या चित्रपटाची 3500 तिकिटांची $50,000 इतकी विक्री झाली आहे. तर ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवसाची या चित्रपटाची 3,000 तिकिटांची विक्री झाली आहे. ज्याची किंमत 65,000 इतकी आहे. जर्मनीमध्ये पाच दिवसांच्या सुरुवातीच्या वीकेंडसाठी 8500 तिकिटे बुक करण्यात आली आहेत. त्यापैकी 4000 तिकिटे ही पहिल्या शोची आहेत. थोडक्यात, परदेशात पठाण चित्रपटाचे एकूण कलेक्शन हे अफलातून आहे. या चित्रपटाची ही क्रेझ पाहता पठाण हा चित्रपट अनेक रेकाॅर्ड तोडणार असे चित्र दिसत आहे.

पठाण चित्रपटाचे प्रमोशन जोरात (Promotion of Pathan Movie is Brilliant)

अभिनेता शाहरूख खान या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करत असल्याचे दिसत आहे. भारतासह परदेशातदेखील या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. नुकतेच दुबईमध्ये बुर्ज खलिफावर या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला आहे. तसेच सोशलमिडीयासह अनेक जागी या चित्रपटाचे प्रमोशनने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत शाहरूख खान (Shahrukh Khan), दिपिका पदुकोन (Deepika Padukone) व जॉन अब्राहम झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यानी केले आहे. यापूर्वी त्यांनी 'बँग बँग' आणि 'वॉर' सारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.