मुंबई : शेअर बाजारात स्मॉल-कॅप कंपन्यांमधून अनेकदा मोठे मल्टीबॅगर तयार होतात. त्यातच एलीटकॉन इंटरनॅशनल या कंपनीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना अपार संपत्ती निर्माण करून दिली आहे. पाच वर्षांत कंपनीचा स्टॉक जवळपास ₹1 वरून ₹184 पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना १३,६००% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

फक्त एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने ५,६८०% पेक्षा जास्त वाढ नोंदवली असून, २०२५ मध्ये आत्तापर्यंत जवळपास १६७०% रिटर्न दिला आहे. जरी सध्या हा स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा जवळपास ५८% नीचांकी पातळीवर आहे, तरीही दीर्घकालीन परफॉर्मन्समुळे तो चर्चेत आहे.
कृषी क्षेत्रातील मोठे अधिग्रहण
कंपनीने नुकतेच आपला FMCG व्यवसाय मजबूत करण्यासाठी कृषी-आधारित दोन कंपन्यांमध्ये नियंत्रणात्मक भागभांडवल विकत घेतले आहे.
- लँडस्मिल अॅग्रो प्रा. लि. मध्ये ५५% हिस्सा घेण्यासाठी सुमारे ₹५३ कोटींचा सौदा करण्यात आला.
- सनब्रिज अॅग्रो प्रा. लि. मध्ये ५१.६५% हिस्सा खरेदीसाठी सुमारे ₹१२८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली.
दोन्ही कंपन्या कृषी उत्पादन आणि allied व्यवसायांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या एकत्रित उलाढालीत २०२४-२५ मध्ये ₹२,८०० कोटींहून अधिक महसूल नोंदवला गेला आहे.
गुंतवणूकदारांसाठी संकेत
या अधिग्रहणामुळे एलीटकॉन इंटरनॅशनलचा उत्पादन पोर्टफोलिओ विविध होईल आणि महसूलाचे स्रोत वाढतील. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय अधिक स्थिर होईल, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. स्मॉल-कॅप असूनही कंपनीने दिलेल्या अफाट परताव्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा या शेअरवर खिळल्या आहेत.