ब्रॅडमन की सोबर्स? गावस्कर की तेंडुलकर? फेडरर की नदाल? प्रत्येक वर्षी 31 मार्च आला की, ELSS (Equity Linked Savings Schemes) की ULIP (Unit Linked Insurance Plan) अशीच काहीशी तुलना सुरु होते. इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतीसह येणारी इन्वेस्ट्मेन्ट्स प्रॉडक्ट्स टॅक्स-सेव्हिंग्सच्या सीझनमध्ये एकमेकांच्या स्पर्धेमध्ये समोरासमोर येतात. साहजिकच, इन्वेस्टर्समध्ये संभ्रम निर्माण होणे आणि दोघांमध्ये अपरिहार्यपणे तुलना होणे, सुरु होते.
ELSS आणि ULIP हे दोन्ही प्रोडक्ट कलम 80C अंतर्गत जरी टॅक्स-सेव्हिंग्ससाठीची आर्थिक साधने असली, तरीही दोघांचेही फीचर्स पूर्णत: भिन्न आहेत. SEBI (भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड) ही ELSS चे नियमन करते, जो पूर्णपणे म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे. ULIP चे नियमन IRDA (विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) द्वारे केले जाते, कारण युलिप हे म्युच्युअल फंड लाभांसह एक इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे.
Table of contents [Show]
गुंतवणुकीची उद्दिष्टे (Investment Objectives)
ELSS चे उद्दिष्ट फक्त “कॉर्पस बिल्डिंग” असून, बहुतेक इक्विटी फंडस् 3 वर्षांच्या “लॉक-इन” कालावधीसह येतात. “अमेझिंग रिटर्न्स” मिळण्यासाठी 5 वर्षांपेक्षा अधिक काळ युनिट्स ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ULIP हे पारंपारिक विमा उत्पादनांपेक्षा वेगळे आहे, कारण ते “इन्शुरन्स” आणि “इन्वेस्ट्मेन्ट” अशा संयुक्त उद्दिष्टांसह डिजाईन केलेले असते.
प्रॉडक्ट फीचर्स आणि वैशिष्ट्ये (Product Features & Objectives)
ULIPs प्रॉडक्ट्स मुख्यतः इन्शुरन्स कंपन्या ऑफर करतात. इन्शुरन्स कंपनी इन्व्हेस्टरला “डेथ-बेनिफिट्स”चे प्रॉमिस करते, ज्या अंतर्गत नॉमिनीला जास्त रक्कम किंवा ULIP मधील म्युच्युअल फंड युनिट्सचे मूल्य मिळते. ELSS हा सरळ म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे आणि तो प्रत्यक्ष विमोचनाच्या वेळी (redemption) इन्वेस्टर्सना निधीचे संपूर्ण मूल्य (Total Fund Value) ऑफर करतो.
परतावा (Return)
ELSS गुंतवणूकदारांनी दिलेले सर्व पैसे फंड युनिट्स खरेदी करण्यासाठी गुंतवते. त्यामुळे ELSS ला ULIP पेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता असणे स्वाभाविक आहे. ULIP फंडमधील काही भागच म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवला गेलेला असतो. शिवाय, जर ULIP ने “डेट सिक्युरिटीज”मध्ये अधिक गुंतवणूक केली तर परतावा “इक्विटी फंडां”पेक्षा कमी असेल, परंतु स्थिर असेल. बहुतेक ELSS मध्ये सरासरी 12-14% परतावा देण्याचा रेकॉर्ड आहे आणि ULIP चे रिटर्न्स फंड्सच्या प्रकारांनुसार 6-17% पर्यंत असू शकतात. ELSS ने बहुतेक वेळा ULIP पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
तरलता (Liquidity)
एकतर, ELSS ही बहुतेकदा इन्वेस्टर्सची “फर्स्ट चॉईस”असते, कारण कलम 80C अंतर्गत येणाऱ्या सर्व कर-बचत साधनांपैकी, ELSS सर्वात कमी म्हणजे 3 वर्षांचा “लॉक-इन” पिरियडसह येते. ULIP चा “लॉक-इन कालावधी” 5 वर्षांचा असतो. जरी ELSS किंवा ULIP मध्ये मुदतीपूर्वी पैसे काढणे शक्य नसले, तरीदेखील लहान लॉक-इनमुळे, ELSS साहजिकच ULIP पेक्षा अधिक तरलता देते.
जोखीम (Risk)
ELSS हे निश्चितपणे एक “High Risk Investment Product” म्हणजे जास्त जोखीमयुक्त गुंतवणूक आहे. मुख्यतः ही एक म्युच्युअल फंड योजना आहे; जी एकूण फंडमध्ये जमा झालेल्या निधीपैकी अंदाजे 80% निधी इक्विटीमध्ये गुंतवलेला असतो. ELSS पेक्षा युलिप तुलनेने कमी जोखमीचे असतात. कारण यामध्ये पॉलिसी कव्हरेजची हमी असते. तसेच, ULIP अंतर्गत इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी, डेब्ट किंवा हायब्रिड फंड (Equity, Debt & Hybrid Fund) युनिटस् असू शकतात.
स्विचिंग ऑप्शन (Switching Option)
ELSS अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीबाबत, इन्वेस्टर्सना इक्विटी-व्यतिरिक्त वेगळ्या फंडाची निवड करता येत नाही. तर ULIP हे एक मुख्यतः इन्शुरन्स प्रॉडक्ट असून, त्याचे गुंतवणूकदार त्यांना हव्या त्या इच्छित असलेल्या फंडाचा प्रकार निवडू शकतात. नंतर ते इक्विटी ते बॉण्डस् अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फंड्समध्ये स्विचिंग ऑप्शन वापरू शकतात.
टॅक्स कॅल्क्युलेशन (Tax Calculation)
ELSS आणि ULIP, या दोन्ही स्कीमस इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 80C अंतर्गत, एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीपर्यंतच करमुक्त आहेत. रिटर्न्सचा विचार केला तर, ELSS अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न्स टॅक्स फ्री आहे. मग मात्र त्यावर इक्विटी फंडप्रमाणे 10% टॅक्स आकारला जातो. ULIP च्या बाबतीमध्ये 1 फेब्रुवारी 2021 पासून, सरकारच्या नवीन नियमानुसार 8AD अंतर्गत, कर लागू केलेला आहे. पूर्वी, ULIP मधून मिळणारे रिटर्न्स सेक्शन 10(10D) अंतर्गत टॅक्स फ्री होते. आता मात्र 2.5 लाखांपर्यंतच्या परताव्यावर कर सवलत एन्जॉय करता येते. त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन (Long Term Capital Gain) असल्यास 15 टक्क्याने आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (Short Term Capital Gain) असल्यास 10 टक्क्याने कर आकारला जातो.
वास्तविकतः या दोन्ही फायनान्शिअल इंस्ट्रुमेंट्सपैकी कोणते प्रॉडक्ट आपल्या आर्थिक उद्दिष्टांची (Financial Goals) पूर्तता करू शकतील, हा निर्णय पूर्णतः व्यक्तिसापेक्ष (subjective) असू शकतो.