Elon Musks Twitter : एलन मस्क (Elon Musks) यांनी ट्विटरचे (Twitter) सीईओ पद सांभाळल्यानंतर सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक कठोर धोरणांमुळे ट्विटरच्या जाहिरात क्षेत्रातील उत्पन्नात घट झाली. त्यानंतर एलन यांनी ब्लू टिक संदर्भात मोठी घोषणा करुन सगळीकडे खडबळ माजवली. त्यानंतर ट्विटरचे मुंबई आणि दिल्लीतील ऑफीस बंद केले. आता एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया,इन्स्टंट मेसेजिंग आणि पेमेंट सेवा एकत्रितपणे देणारे लोकप्रिय चीनी अॅप WeChat सारखे असू शकते, असे सांगितले आहे. एवढेच नाही तर चिमणी म्हणून ओळख असलेला ट्विटरचा लोगो देखील बदलविण्यात आला.
कुठल्याही गोष्टींवर चर्चा करण्याचे सामूहिक माध्यम
सोशल अॅपचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारे जेन मंचुन वोंग म्हणाले की, असंख्य अब्जाधीश लोकांनी ट्विटरवर टिक केले असले तरी, त्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांचा परिणाम त्याच्या मुख्य प्लॅटफॉर्मवर झाला आहे. मात्र हे माध्यम आजही कुठल्याही गोष्टींवर चर्चा करण्याचे सामूहिक माध्यम आहे.
वापरकर्त्यांचे अनुभव बदलले
तरीही ट्विटर वापरकर्त्यांचे अनुभव बदलत आहे. ट्विटरच्या अनेक पोस्टवर पडद्यामागे असलेली एलन मस्कची भूमिका लक्षात येते. या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मशी जुळलेले अल्गोरिदम हे ठरवत असते की, कुठली पोस्ट सगळ्यात शेअर व्हायला पाहिजे आणि कुठली नाही. लोकांची ओळख पटवुन देणारी वेरीफिकेशन प्रोसेस बदलली आहे. तसेच अनेक प्रकारच्या ट्विट संदर्भातील नियम बदलले आहे.
कर्मचाऱ्यांनी केली नाराजी व्यक्त
काही जणांचे म्हणणे आहे की, ट्विटर आहे तसचं दिसत असलं तरी जे ट्विट लोकांपूढे येतात, ते आधी वाचले जातात. आणि यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये देखील नाराजी आहे. एवढेच नाही तर आता पिवळे चेक मार्क कॉर्पोरेट खाती दर्शवतात,तर राखाडी चेक मार्क्स सरकारी अधिकाऱ्यांची खाती दर्शवतात. कंपन्या त्यांचा लोगो कर्मचार्यांच्या खात्यात जोडू शकतात, त्यांच्या रोजगाराची पडताळणी करू शकतात. पैसे देणाऱ्या व्यक्तींना निळा-पांढरा चेक मार्क मिळतो. तसेच आता प्रत्येक ट्विटला रिप्लाय, लाईक्स, रिट्विट्स, बुकमार्क्स आणि व्ह्यूजची संख्या जोडलेली आहे.