Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk : ट्विटरची खरेदी करणं हा चूकीचा निर्णय होता, एलॉन मस्कने व्यक्त केलं दु:ख

Elon Musk

Elon Musk Twitter : व्यावसायिक आयुष्यामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा ठरला. ना नफा स्वरूपात सुरू असलेली ही कंपनी केवळ चार महिन्यांमध्ये बंद करावी लागली असती म्हणून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची कबुली एलॉन मस्क यांनी दिलीये.

Elon Musk : ट्विटर या सोशल मिडीया प्लेटफॉर्मचे मालक एलॉन मस्कनी ट्विटरची खरेदी केल्यापासून खूपच चर्चेत आहेत. ट्विटर संबंधित धोरणांमध्ये केलेल्या बदलांपासून ते त्यांच्या चित्रविचित्र ट्विटमुळे नेहमीच माध्यमामध्ये त्यांच्यावर चर्चा सुरू असते. अलिकडेच एलॉन मस्क यांनी बीबीसी संदर्भात वक्तव्य केलेलं. यानंतर बीबीसी कडून एलॉन मस्क यांच्या मुलाखतीचा काही भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये एलॉन मस्क  यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट सुद्धा केले आहेत.

ट्विटरची खरेदी करण्याचा निर्णय चुकला

एलॉन मस्क यांनी पहिल्यांदाच बीबीसीच्या मुलाखतीमध्ये ट्विटर प्लेटफॉर्मच्या खरेदी संबंधित वक्तव्य करत खंत व्यक्त केली आहे. व्यावसायिक निर्णयामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा निर्णय चुकला यांची कबुली मस्क यांनी दिलीये. ते पुढे म्हणाले की, ट्विटर ही आत्तापर्यंत ना नफा स्वरूपात चालणारी कंपनी होती. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीनुसार कंपनी चालवणं कठिण होतं. त्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली. जवळपास 6,500 कर्मचाऱ्यांना मस्क यांनी नोकरीवरून काढुन टाकलं. आता ट्विटरमध्ये 1,500 कर्मचारी काम करत आहेत.

जाहिरातदारांनी फिरवली पाठ

एलॉन मस्क यांनी ट्विटर प्लेटफॉर्म खरेदी केल्यावर ट्विटरच्या एकुण उत्पन्नामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येतं. याची कबुली सुद्धा मस्क यांनी दिली आहे. ट्विटरचे वार्षिक उत्पन्न जे पूर्वी 4.5 बिलीयन डॉलर होते ते आता 3 बिलीयन डॉलर होत आहे. जाहिरातीमधुन मिळणारे उत्पन्न घटल्याचा फटका ट्विटरला बसला आहे. अधिकतर राजकीय जाहिरातदारांनी जाहिरात देण्याचं बंद केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यापैकी अनेक जाहिरातदार हे आपल्याकडे परत येतील असा विश्वास ही मस्क यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

एलॉन मस्क यांनी बीबीसीला दिलेल्या या मुलाखतीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. जवळपास 3.3 मिलीयन लोकांनी ही मुलाखत लाईव्ह पाहिली.

स्क्विटर या यूजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मस्क यांनी बीबीसीवर जो सरकार पुरस्कृत मीडियाचा शिक्का लावला तो पुसण्यासाठी बीबीसीने अशाप्रकारची मुलाखत घेतली आहे, असं म्हणत टीका केली आहे. 

तर द टिव्ही ग्रुम्प या यूजरने मीम्सच्या माध्यमातून या संपूर्ण मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.