Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

4.38 लाख रुपयांमध्ये मिळेल ही Electric Bike; चालविण्यासाठी लायसन्सचीही नाही गरज

Electric Bike

Image Source : www.carandbike.com

Electric Moped Bike: 'Electric Moped Bike' आकाराने लहान आणि वजनाने हलकी असल्याने गर्दीतही सहज चालवता येते. शहरांमधील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या प्रोफेशनल व्यक्तीसाठी ही तयार करण्यात आली आहे.

Electric Moped Bike: इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्माता कंपनी Polestar ने स्वीडिश दुचाकी निर्माता कंपनी ‘Cake’ च्या सहकार्याने केक मक्का (Cake Makka) ही नवीन इलेक्ट्रिक मोपेड बाईक(Electric Moped Bike) लॉन्च केली आहे. Electric Moped Bike आकाराने लहान आणि वजनने हलकी असल्याने गर्दीतही सहज चालवता येते. शहरांमधील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या प्रोफेशनल व्यक्तीसाठी तयार करण्यात आली आहे. चला तर Electric Moped Bike बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Electric Moped Bike ची किंमत किती?

या बाईकमधील बॅटरीने काढता येण्याजोगी सुसज्ज आहे. म्हणजेच चार्जिंगची आवश्यकता असल्यास मोपेडमधून बॅटरी काढून तुम्ही चार्ज करू शकता. यात 1.55 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली आहे. या मोटरमधून 2.8 kW ची पॉवर देण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने कॉम्पॅक्ट लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 55 किमी रेंज देते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने याची किंमत 5,300 डॉलर्स जाहिर केली असून भारतात ही बाईक लॉन्च झाल्यावर याची किंमत सुमारे 4.38 लाख रुपये असणार आहे.

Electric Moped Bike चालविण्यासाठी  'ड्रायव्हिंग लायसन्स'ची गरज नाही  

सध्या ही ‘Electric Moped Bike’ युरोपच्या बाजारपेठेपुरती मर्यादित असून भारतात ही बाईक लॉन्च होण्याची शक्यता खूपच कमी आहे. या बाईकचा टॉप स्पीड 45 किमी/तास आहे. युरोपमध्ये ही मोपेड चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स व RTO च्या नोंदणीची  आवश्यक नाही. याच्या डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर, या बाईकची डिझाईन सिम्पल आणि वजनाने हलकी असून त्यामध्ये फार कमी भाग वापरले आहेत. आरामदायी राईडसाठी या बाईकला पुढच्या बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक युनिट दिले आहे. ब्रेकिंग सुधारण्यासाठी या मोपेडमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत.

E-Motorad फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल

या दरम्यान फॅट टायर सायकल असलेली E-Motorad ने अलीकडेच आपली नवीन फोल्डेबल ई-सायकल डूडल V2 भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत  49,999 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक सायकल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तसेच Amazon, Flipkart, Croma आणि ऑफलाईन रित्या खरेदी केली जाऊ शकते. या बाईकबद्दल फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. यात  24 Ah ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली असून बॅटरीच्या पॉवरवर 55 ते 60 किलोमीटर ही बाईक धावू शकते असेही कंपनीचे म्हणणे आहे.