Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Increase car mileage : कारचं मायलेज वाढवायचंय? गियरची 'ही' ट्रिक लक्षात ठेवा!

Increase car mileage : कारचं मायलेज वाढवायचंय? गियरची 'ही' ट्रिक लक्षात ठेवा!

Increase car mileage : चारचाकी घेताना कारचं मायलेज पाहिलं जातं. पण प्रत्येकवेळी कंपनीनं दावा केलेलं मायलेज आपल्याला मिळेल, असं नाही. वाहतुकीच्या समस्या तसंच चालवण्याची पद्धत यावरही हे मायलेज अवलंबून असतं. काही सोप्या गोष्टी कार चालवताना आपण फॉलो केल्या तर निश्चितच आपल्याला समाधानकारक मायलेज मिळू शकतं.

इंधनातली दरवाढ (Fuel price hike) ही एक सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनलीय. मागच्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढलेल्या नाहीत. मागच्या वर्षी साधारणपणे मे महिन्यात मोठी दरवाढ झाली होती. त्यानंतर हे दर स्थिर आहेत. राज्यात पेट्रोल 110 रुपयांच्या आसपास आहेत. डिझेलही 100 रुपयांच्या आसपास आहेत. यात शहरानुसार थोडा बदल वगळता ही मोठी दरवाढ आहे. त्यामुळे महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे कार चालवणंही जास्तच महाग झालंय. अशावेळी काही युक्त्या कामाला येतील. यातून कारचं मायलेज (Car mileage) निश्चितच वाढेल.

ड्रायव्हिंग कशी करता?

अनेकांना वाटतं, की इंजिनाची क्षमता जशी असेल त्याप्रमाणं मायलेज मिळेल. मात्र हे पूर्ण सत्य नाही. तुम्ही कार कशी चालवता यावरही हे मायलेज अवलंबून असतं. कोणत्या गिअरमध्ये तुम्ही गाडी चालवता, यावर मायलेज ठरत. हे नेमकं कसं होतं, त्यावरही एक नजर टाकूया...

गाडीचा वेग

कोणत्याही कारचा पहिला गियर सर्वात जास्त पॉवर देणारा असतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कमीत कमी मायलेज देतं. टॉप गिअरमध्ये कार चालवल्यानं तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज मिळतं, असं म्हटलं जातं. मात्र अशावेळी गाडीचा वेग योग्य असायला हवा. टॉप गियरमध्ये 70-80 किमी प्रतितास वेगानं कार चालवली तर कारचं मायलेज वाढवण्यास मदत करू शकतं.

शहरात कसं मॅनेज करायचं?

शहरात कार चालवणं किंवा अधिक मायलेज राखणं हे खूप कष्टाचं काम आहे. शहरातले रस्ते हे वाहतुकीनं भरलेले असतात. त्यामुळे अनेकवेळा थांबत थांबत किंवा योग्य वेग न राखता कार चालवावी लागते. अशावेळी टॉप गियरमध्ये गाडी चालवल्यास इंजिनवरचा भार वाढेल. सहाजिकच त्याचा मायलेजवर परिणाम होऊन ते कमी होईल. त्यामुळे शहरात गाडी चालवत असाल तर टॉप गिअरवर न चालवता तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्ये गाडी चालवावी. त्यामुळे मायलेज वाढवण्यात मदत होईल.

क्लचचा चुकीचा वापर

गाडी चालवताना अनेकजण क्लचवर पाय ठेवून असतात. वास्तविक क्लचवर पूर्णवेळ पाय ठेवायची गरज नाही. तर काहीजणांना क्लचचा वापर न करता गिअर बदलण्याची सवय असते. या दोन्ही चुकीच्या गोष्टींचा परिणाम गाडीचे पार्ट्स खराब होण्यात होतो.

कार चालवताना वापरा या टिप्स

  • इंजिन, ट्रान्समिशन आणि चालवण्याची शैलीवर यावर कारचं मायलेज अवलंबून असतं
  • एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करावं किंवा बदलावं.
  • एअर फिल्टर खराब असेल तर ते इंजिनच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम करतं. त्यामुळे मायलेज कमी होतं.
  • टायरचा दाब सतत तपासून पाहायवा हवा.
  • इंजिन ऑइल ठराविक कालावधीनंतर नियमितपणे बदलत राहावं.
  • क्लचचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा.