Manual Gear Car Driving Tips: ऑटो इंडस्ट्रीमध्ये हल्ली अनेक नवनवीन फीचर्स कारमध्ये आणले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन(Manual Transmission or Automatic Transmission) होय. यामध्ये वाहन चालकाला गाडी चालवताना गियर(Gears) बदलण्याची गरज नसते. आता मोठ्या प्रमाणावर ही सिस्टीम कारमध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडेही मॅन्युअल गिअर लीव्हर(Manual gear lever) असलेली कार असेल, तर गाडी चालवताना चालकाकडून अनेकदा अशा काही चुका होतात, ज्यामुळे कार खराब होण्याची दाट शक्यता असते. सुरळीत आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी, मॅन्युअल कार चालवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
क्लच(Clutch) दाबल्याशिवाय हे काम नये
क्लचला(Clutch) डिप्रेस न करता गीअर्स बदलू नये. कारण क्लच हा मॅन्युअल ट्रान्समिशन कारचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून जर तुम्ही क्लच न दाबता गीअर्स बदलण्याचा प्रयत्न केला, तर ते ट्रान्समिशन खराब होण्याची दाट शक्यता असते. ज्यामुळे तुमची कार रस्त्याच्या मधोमध बंद देखील पडू शकते.
चुकीच्या गिअरमुळे(Wrong gear) होऊ शकते नुकसान
मॅन्युअल गीअर लीव्हरने(manual gear lever) कार चालवत असाल तर तुम्हाला समजून येईल की, योग्य गतीमध्ये योग्य गियर असणे(Right gear at the right speed) किती महत्त्वाचे आहे. स्पीड आणि गियरचा समन्वय खूप महत्वाचा असतो, जर तुम्ही चुकीच्या गियरमध्ये गाडी चालवली तर ट्रान्समिशन खराब होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर तुमच्या वाहनात इतर यांत्रिक समस्याही निर्माण होतात. जर तुमच्या कारमध्ये गीअर शिफ्ट इंडिकेटर(Gear shift indicator) असेल तर त्यावरही सतत लक्ष ठेवा. योग्य गतीने योग्य गियर पडत नसल्यास, ते RPM (Revolutions per minute) वर देखील परिणाम करते.
क्लच(Clutch) सतत दाबून ठेवणे
तुम्हालाही सतत पाय क्लचवर ठेवायची सवय असेल, ज्यामुळे कार चालत असतानाही क्लच(Clutch) दाबला जात असेल तर असे करणे टाळा. गरज असेल तेव्हाच क्लच दाबा, अन्यथा जर तुम्ही क्लच जर दाबून ठेवत असाल तर क्लच प्लेट तुटू शकते, इतकेच नाही तर क्लच प्लेटमुळे समस्या निर्माण होऊ लागल्यास गियर बदल्यात अडचण येऊ शकते.