Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan FAQ: अगोदर भरलेली फी एज्युकेशनल लोनमध्ये कव्हर होते का?

Education Loan FAQ

Image Source : www.istockphoto.com

Education Loan FAQ: भारतातील काही बँका शैक्षणिक कर्ज देताना अगोदर भरलेली फी रिइम्बर्समेंट करून देतात. पण प्रत्येक बँक अशी सुविधा देतेच असे नाही. चला तर याबाबतचे नियम जाणून घेऊ.

Education Loan FAQ: एज्युकेशनल लोन आपण जरी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच घेण्याचा विचार करतो. पण कर्ज देणाऱ्या बँकांचे काम हे वर्षभर सुरू असते. कारण बहुतांश बँका एज्युकेशनल लोन हे थेट विद्यापीठ किंवा संस्थेच्या खात्यात पाठवत असते. त्यातही काही बँका फीच्या रचनेनुसार 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी फीची रक्कम पाठवत असतात. त्यामुळे शैक्षणिक फी आणि एज्युकेशनल लोन ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. पण प्रत्येक बँकांचे याबाबत काही वेगवेगळे नियम आहेत, ते समजून घेणे आवश्यक आहे.

अगोदर भरलेली फी Reimbursement होते का?

विद्यापीठाचे किंवा शैक्षणिक संस्थांचे जसे नियम आहेत. तसे बँकांचेही काही स्वत:चे नियम आहेत. त्या नियमांतर्गत काही बँका अगोदर भरलेली फी रिइम्बर्समेंट करून देतात. पण यासाठी संबंधित बँकेचे आणि ज्या विद्यापीठात / संस्थेत प्रवेश घेतला आहे त्यांचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक विद्यापीठांचा आणि कर्ज देणाऱ्या बँकांचे टाय-अप असते. त्यामुळे त्या दोन्ही संस्थांना आपापल्या नियमांची कल्पना असते. त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन घेऊन पुढील प्रक्रिया करणे सोपे ठरू शकते.

शिक्षणासाठी एखाद्या संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत कर्ज मंजूर करून घेणाऱ्या विद्यार्थ्याची अगोदर भरलेली वार्षिक किंवा सेमिस्टर फी रिइम्बर्समेंट करून मिळते. प्रत्येक बँकेचे याबाबतचे नियम वेगवेगळे असतात.

एज्युकेशनल लोन किती दिवसांत मिळते?

एज्युकेशनल लोनसाठी अर्ज केल्यानंतर किमान 7 वर्किंग डेजमध्ये बँकेकडून कर्ज पास होणे अपेक्षित आहे. पण त्यासाठी अर्जदाराने सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा करणे गरजेचे आहे.

शैक्षणिक कर्ज घेताना सवलत योजनेचा लाभ कसा मिळू शकतो?

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असते. यासाठी सरकार विविध प्रकारच्या सवलत योजना राबवते. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास आणि विशेष जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते. त्याची माहिती बँकेचे अधिकारी व सरकारच्या योजना पत्रकांमधून मिळवता येते.

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी गुणांची अट असते का?

होय, शैक्षणिक कर्ज मिळवताना बँकेचे काही बेसिक नियम आहेत. त्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षात किती गुण मिळाले आहेत. हे तपासले जाते. जसे की भारतात राहून आणि भारताबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागील वर्षी किमान 60 टक्के गुण मिळालेले हवेत.

उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना मिळेल त्या बँकेतून कर्ज घेण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमधून सर्वप्रथम माहिती घ्या. प्रत्येक बँकेचा व्याजदर, नियम, कागदपत्रे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिपेमेंटचा कालावधी प्रत्येक बँक किती देते, याचा अभ्यास करा आणि जो तुम्हाला परवडणारा आणि सोयीचा वाटेल त्या बँकेची एज्युकेशन लोनसाठी निवड करा.