Educational Loan FAQ: एज्युकेशन लोन हा पैशांमुळे शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांवरील एक उपाय आहे. या शैक्षणिक कर्जाचा पालकांना किंवा अर्जदाराला नक्कीच इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत टॅक्स सेव्हिंगसाठी लाभ घेता येतो. कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या 1.50 लाखापेक्षा यातून अतिरिक्त लाभ घेता येतो. पण ही सवलत अर्जदाराने व्याज भरण्यास सुरुवात केल्यानंतरच मिळते. तसेच कर्जाची रक्कम पूर्णपणे फिटेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 8 वर्षापर्यंत अर्जदाराला या सवलतीचा लाभ घेता येतो.
Table of contents [Show]
- एज्युकेशनल लोनसाठी काही तारण ठेवावे लागते का?
- एज्युकेशनल लोनमधील पैसे थेट विद्यापिठाकडे / कॉलेजकडे जमा होतात?
- परदेशातील अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त किती कर्ज मिळते?
- शिक्षणात खंड पडल्यास त्याचा परिणाम एज्युकेशनल लोनवर होतो का?
- प्री-पेमेंटवर बँका दंड लावतात का?
- ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे? त्या बँकेत खाते असावे लागते का?
- पहिले शैक्षणिक कर्ज फेडल्यानंतर दुसरे मिळते का?
- बँका फॉरेन करन्सीमध्ये कर्ज देतात का?
- मुलींना शैक्षणिक कर्जामध्ये काही सवलत मिळते का?
- SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामध्ये काही सवलत मिळते का?
- NRI विद्यार्थ्यांना भारतीय बँका शैक्षणिक कर्ज देतात का?
एज्युकेशनल लोनसाठी काही तारण ठेवावे लागते का?
लोनच्या बाबतीत प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम असतात. पण आपण त्यातील प्रमुख नियम जे सर्व बँकांना लागू होतात, त्याबद्दल जाणून घेऊ.
- 4 लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही किंवा गॅरंटरचीही गरज भासत नाही.
- 4 ते 7.50 लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण नाही पण हमी म्हणून गॅरंटर लागतो.
- 7.50 लाख आणि त्यापेक्षा अधिकच्या शैक्षणिक कर्जासाठी बँक तारण वस्तुचू मागणी करते.
- तारण वस्तुंमध्ये एलआयसी पॉलिसी, किसान विकास पत्र, मुदत ठेवींचे सर्टिफिकेट, प्रॉपर्टीची कागदपत्रांचा समावेश होतो.
एज्युकेशनल लोनमधील पैसे थेट विद्यापिठाकडे / कॉलेजकडे जमा होतात?
कोर्ससाठी निश्चित करण्यात आलेली एज्युकेशन फी, हॉस्टेल फी ही थेट कॉलेजच्या खात्यात जमा होते. तर उर्वरित फी ही शेड्युलनुसार कॉलेजमध्ये जमा होते. याव्यतिरिक्त लॅबसाठी लागणाऱ्या गोष्टींचा खर्च, लॅपटॉप, युनिफॉर्म प्रवासाचा खर्च हा अर्जदाराला क्लेम करून बँकेकडून घ्यावा लागतो.
परदेशातील अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त किती कर्ज मिळते?
भारतातील बऱ्याचशा बँका शिक्षणासाठी होणाऱ्या एकूण रकमेपैकी 90 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात देते. तर काही निवडक बँका खर्चाच्या 100 टक्के कर्ज देतात. अर्थात ही रक्कम पालक किंवा गार्डिअन यांच्या मासिक उत्पन्नावर आधारित असते. त्याचबरोबर विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, तारण ठेवण्यासाठी काही वस्तू असल्यास बँका याचा सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रयत्न करतात.
शिक्षणात खंड पडल्यास त्याचा परिणाम एज्युकेशनल लोनवर होतो का?
शिक्षणासाठी कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला एक ठराविक वेळ दिला जातो. कर्ज परतफेड करण्यापूर्वीचा कालावधी हा इंटरेस्ट फ्री पिरिअड असतो. साधारण विद्यार्थ्याने त्याचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर 6 ते 1 वर्षाच्या कालावधीनंतर कर्जाची परतफेड सुरू करावी लागते. दरम्यान, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडल्यास त्याला इंटरेस्ट फ्री पिरिअड वाढवून द्यायचा का नाही हे सर्वस्वी बँकेवर अवलंबून असते.
हे सुद्धा वाचा: एज्युकेशनल लोन काय असते, ते कोणाला मिळू शकते?
प्री-पेमेंटवर बँका दंड लावतात का?
बहुतांश बँका एज्युकेशनल लोनच्या प्री-पेमेंटवर दंड लावत नाही. पण तरीही कर्ज घेताना बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून किंवा अॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी हा नियम समजून घ्यावा.
ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे? त्या बँकेत खाते असावे लागते का?
पूर्वी अशाप्रकारचा नियम होता. म्हणजे ज्या बँकेतून कर्ज घ्याचे आहे; तिथे खाते असणे गरजेचे होते. पण तसा काही नियम नाही. पण ज्या बँकेत आपले खाते असते. तिथल्या रिलेशनवर काही गोष्टी पटकन होण्यास मदत होऊ शकते.
पहिले शैक्षणिक कर्ज फेडल्यानंतर दुसरे मिळते का?
होय, एखाद्या विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी कर्ज घेतले आणि ते वेळेत परत सुद्धा केले. त्यानंतर त्याच विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा इतर कोर्ससाठी कर्ज मागितले तर त्याला बँकेकडून कर्ज मिळू शकते.
बँका फॉरेन करन्सीमध्ये कर्ज देतात का?
बँका परदेशातील विद्यापीठांना किंवा तिथल्या एज्युकेशनल संस्थांना त्यांच्या चलनामध्ये फी देतात. उदाहरणार्थ, डॉलर, युरो, पाउण्ड इत्यादी. पण बँका यासाठी कर्जदाराकडून याचे आरबीआयच्या नियमानुसार चलन ट्रान्सफर फी चार्ज करते.
मुलींना शैक्षणिक कर्जामध्ये काही सवलत मिळते का?
भारतातील बऱ्याच बँका मुलींना शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात 0.5 टक्क्यापर्यंत सवलत देतात. ही सवलत भारतात किंवा भारताबाहेर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळते.
SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामध्ये काही सवलत मिळते का?
होय, भारतात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना कायद्यातील तरतुदीनुसार काही प्रमाणात सवलत मिळते. या सवलतीसाठी काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
NRI विद्यार्थ्यांना भारतीय बँका शैक्षणिक कर्ज देतात का?
NRI विद्यार्थ्यांकडून एज्युकेशनल लोनसाठी भारतीय बँकांकडे मागणी झाल्यास बँका नियमानुसार या विद्यार्थ्यांना कर्ज देऊ शकतात. यामध्ये सदर विद्यार्थ्याकडे भारतीय पासपोर्स असणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्रता त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात. त्याचबरोबर तारण म्हणून बँकेकडे काहीतरी जमा करावे लागेल.