शैक्षणिक कर्ज ज्याला विद्यार्थी कर्ज असंही म्हटलं जातं. देशात किंवा परदेशात, कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याला सहाय्य करतं. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांद्वारे कर्ज दिलं जातं. इतर किरकोळ कर्जाप्रमाणेच शैक्षणिक कर्जही या कर्जाच्या परतफेडीसाठी एक ते दोन वर्षांच्या मुदतवाढीसह देण्यात येतात. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम (Pradhan Mantri Vidya Lakshmi Karyakram) या माध्यमातूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाच्या प्रश्नावर उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. https://www.india.gov.in या वेबसाइटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
मुलींसाठीच्या कर्जाच्या योजनांचा विचार केल्यास बँकांमार्फत विशेष सवलतही देण्यात येते. काही महत्त्वाच्या योजना पाहू...
Table of contents [Show]
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट विद्यार्थी
- कॉर्प विद्या योजना
- इंडियन ओव्हरसीज बँक एज्युकेशन लोन - विद्या ज्योती
- आयडीबीआय बँक शैक्षणिक कर्ज
- बडोदा स्कॉलर लोन
- अॅक्सिस बँक शैक्षणिक कर्ज
- क्रेडिला एज्युकेशन लोन
- मुलींच्या शैक्षणिक लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
- क्रेडिट तपासणीची गरज नाही
- संस्था कोणत्या?
- 2023मधील सर्वोत्तम पर्याय
- व्याजदरात काही सवलत?
- ईएमआय कधीपासून भरावा?
- शैक्षणिक कर्जांतर्गत कोणकोणते खर्च समाविष्ट?
- कर्ज प्री-पे करता येईल?
- उत्पन्नासह सह-अर्जदार नसल्यास काय?
- कर्जाचा कालावधी वाढवण्याची मुभा
- व्याज अनुदान काय?
- आयबीए मॉडेल शैक्षणिक कर्ज योजना काय?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट विद्यार्थी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देते. भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी 10 लाख तर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर 20 लाखांपर्यंतचं कर्ज मंजूर केलं जाऊ शकतं.
कॉर्प विद्या योजना
कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया महिलांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये मुलींसाठीच्या कर्जावरच्या व्याजदरापेक्षा 50 bpsपर्यंत कमी सवलत देते. भारतात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी ही सवलत दिली जाते.
इंडियन ओव्हरसीज बँक एज्युकेशन लोन - विद्या ज्योती
मुलींसाठी हे शैक्षणिक कर्ज व्याजावर 0.5 टक्के सवलत आहे. भारतात शिक्षणासाठी जास्तीत जास्त कर्ज 30 लाख रुपये आणि परदेशात अभ्यासक्रम करण्यासाठी 40 लाख रुपये दिले जातात. विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना व्याजाची परतफेड करू शकतात किंवा ते मूळ रकमेसह देऊ शकतात. परतफेडीचा कालावधी 5 ते 7 वर्षे आहे. यासह एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदाया बँकाही व्याजदरावर सबसिडी देतात. उ
आयडीबीआय बँक शैक्षणिक कर्ज
आयडीबीआय बँक महिलांना शिपिंग, एरोनॉटिक्स, पायलट प्रशिक्षण आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसारख्या विशेष अभ्यासक्रमांचा खर्च भागवण्यासाठी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
बडोदा स्कॉलर लोन
बँक ऑफ बडोदा परदेशात पदवी, पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट अभ्यासक्रम करणाऱ्या महिला विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देते.
अॅक्सिस बँक शैक्षणिक कर्ज
अॅक्सिस बँक महिलांना परदेशात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज देते. कर्जाच्या रकमेमध्ये शिक्षण शुल्क, पुस्तकांची किंमत आणि वसतिगृहाची फी आदींचा समावेश आहे.
क्रेडिला एज्युकेशन लोन
क्रेडिला, एचडीएफसी लि. कंपनी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना शैक्षणिक कर्जाची सुविधा देते.
मुलींच्या शैक्षणिक लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक कर्जासाठी खालील कागजपत्रे महत्त्वाची आहेत. याशिवाय बँक इतर काही कागदपत्रे मागू शकते.
- संस्थेचं अॅडमिशन लेटर
- मार्कशीट (दहावी, बारावी, ग्रॅज्युएट)
- बोनाफाइड (कोणतेही एक)
- वयाचा दाखला
- संपूर्ण अर्ज
- फोटो
- रीतसर स्वाक्षरी केलेलं वितरण विनंती पत्र
- विद्यापीठ शुल्क मागणी पत्र
- अर्जदाराचा शैक्षणिक प्रगती अहवाल (मागील सेमिस्टर)
- फ्रेश रिपेमेंट इन्स्ट्रक्शन्स
- संस्थेनं जारी केलेलं मागील सेमिस्टरच्या देयक पावतीची प्रत.
मुलींसह इतर विद्यार्थ्यांनादेखील शैक्षणिक कर्जाची आवश्यक भासत असते. त्यांच्यासाठीदेखील विविध बँका आणि वित्तीय संस्था कर्जपुरवठा करतात. त्यासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया…
क्रेडिट तपासणीची गरज नाही
अंडरग्रॅज्युएट्सना क्रेडिट तपासणीची गरज नाही. माता-पिता किंवा पालकांना त्यांचे उत्पन्न आणि सुरक्षा म्हणून ठेवलेले संपार्श्विक यांच्या आधारावर क्रेडिट मिळविण्यासाठी पात्र असणं गरजेचं आहे. खरं तर शैक्षणिक कर्ज अत्यंत महाग आहेत. मात्र सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या मार्फत वितरित केलेल्या कर्जाच्या तुलनेत कमी दर देतात.
संस्था कोणत्या?
नेमक्या अशा कोणत्या संस्था आहेत, ज्यांच्यामार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्यावर एक नजर टाकणार आहोत. फोर्ब्स अॅडव्हायझर इंडियानं याविषयी सविस्तर माहिती दिलीय. यात प्रमुख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांच्या मार्फत ऑफर करण्यात आलेल्या 43 शैक्षणिक कर्जाची माहिती दिली आहे. या लिस्टमध्ये फाइव्ह स्टार कर्जदार नाहीत. मात्र 2023चा विचार केल्यास व्याजाचा सर्वात कमी दर सोबतच सुरक्षितता, पात्रता आणि एकूणच त्यांचे कर्ज निकष अशा सर्वच बाबींचा विचार करून सर्वोत्तम शैक्षणिक कर्ज ऑफर करणार्या काही अग्रगण्य बँकांचे पर्याय आम्ही देत आहोत.
2023मधील सर्वोत्तम पर्याय
- स्टेट बँक ऑफ इंडिया : कमी व्याजदरासह सर्वोत्तम अनुकूलित शैक्षणिक कर्ज.
- पंजाब नॅशनल बँक : ओआयसी (Overseas Citizen of India) प्रकारातील किंवा परदेशात जन्मलेल्या मात्र भारतात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम.
- आयसीआयसीआय बँक : कॅनडामधील नामांकित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सर्वोत्तम.
- बँक ऑफ बडोदा : नर्सरी ते बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासासाठीच्या कर्जामध्ये सर्वोत्तम.
- बँक ऑफ इंडिया : प्रक्रिया शुल्क नाही. कमी व्याजदरासह कर्जामध्ये सर्वोत्तम.
- बँक ऑफ महाराष्ट्र : गुणवंत विद्यार्थ्यांना व्याजदरात सवलत मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कर्ज.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया : नामांकित व्यवस्थापन संस्थांमधून एमबीए करणाऱ्या एक्झिक्युटिव्ह्ससाठी सर्वोत्तम शैक्षणिक कर्ज.
व्याजदरात काही सवलत?
व्याजदरात तुम्हाला सवलत मिळू शकते. तुमच्या बँकेशी असलेलं तुमचं नातं कसं आहे, हे महत्त्वाचं आहे. गुणवंत विद्यार्थी, महिला कर्जदार, अल्पसंख्याक समुदाय गट यांनादेखील 0.50 टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो. मग व्याजदर सबसिडी योजना, कर सूट योजना आदींचा उपयोग होऊ शकतो.
ईएमआय कधीपासून भरावा?
शिक्षण सुरू असताना बँका तुम्हाला रक्कम भरण्यास सांगत नाहीत. मात्र या कालावधीत किमान व्याज रक्कम भरण्याचा विचार करणं उत्तम असतं. कोर्स कालावधीच्या दरम्यान व्याज भरत राहिल्यास काही बँका कमी दरांचा लाभ घेतात.
शैक्षणिक कर्जांतर्गत कोणकोणते खर्च समाविष्ट?
एज्युकेशन लोनमध्ये संबंधित विद्यार्थ्याचा परदेशात राहण्याचा आणि पदवी शिक्षणादरम्यानचा जवळजवळ संपूर्ण खर्च समाविष्ट असतो. यात ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, वाहतूक शुल्क, वसतिगृह शुल्क, पुस्तकं आणि इतर विविध शुल्क.
कर्ज प्री-पे करता येईल?
लोन प्री-पे करण्याची सुविधा आहे. फोरक्लोजरला परवानगी असणार आहे. ही प्रक्रिया बँकांवर अवलंबून आहे, प्री-पेमेंट शुल्क आकारलं जाऊ शकतं किंवा शुल्क आकारणी नसतेही. आम्ही जी लिस्ट उपलब्ध करून दिली, त्यातल्या बहुतांश बँका प्री-पेमेंटवर शुल्क आकारत नाहीत.
उत्पन्नासह सह-अर्जदार नसल्यास काय?
उत्पन्नासह सह-अर्जदार नसल्यास शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करता येवू शकतो. जे अर्जदार पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणार आहेत तसंच त्यावरील सह-अर्जदाराशिवाय शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करता येईल.
कर्जाचा कालावधी वाढवण्याची मुभा
विद्यापीठानं अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवल्यास बँकादेखील कर्जाचा कार्यकाळ वाढवू शकतात.
व्याज अनुदान काय?
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक सकल पालक किंवा कौटुंबिक उत्पन्न INR 4.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी केंद्रीय क्षेत्र व्याज अनुदान योजना (CSIS) सुरू केली आहे.
आयबीए मॉडेल शैक्षणिक कर्ज योजना काय?
भारतीय बँकांची संघटना भारत आणि परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी होतकरू आणि गुणी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून आयबीए मॉडेल शैक्षणिक कर्ज उपलब्ध करते.