Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TATA Trust Scholarship Program: टाटा ट्रस्टकडून खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मिळते उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप

tata trust

TATA Trust Scholarship Program: टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. 1892 पासून टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट उपक्रम राबवला जातो. गरजूंना शिक्षणासाठी मदत करणारा हा देशातील सर्वात जुन्या उपक्रमांपैकी एक आहे.

देशातील मोठ्या आणि जुन्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचे सामाजिक उपक्रमांसाठी भरीव योगदान आहे. टाटा समूहाच्या टाटा ट्रस्टकडून खेळांडूना तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली असणारी ही एक खासगी स्कॉलरशीप आहे. यात शिक्षणापुरता अर्थसहाय्य केले जाते. (TATA Trust Scholarship Program)

टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. 1892 पासून टाटा ट्रस्टकडून जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट उपक्रम राबवला जातो. गरजूंना शिक्षणासाठी मदत करणारा हा देशातील सर्वात जुन्या उपक्रमांपैकी एक आहे.

जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट अंतर्गत परदेशात मास्टर्स, पीएच.डी आणि त्यावरील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. या शैक्षणिक कर्जाचा कालावधी 7 वर्षांचा असून विद्यार्थ्याला तिसऱ्या वर्षानंतर दरवर्षी समान रक्कम परतफेड करावी लागते.  या योजनेत इयत्ता आठवीनंतरचे शिक्षण किंवा इंजिनिअरिंगवगळता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत अर्थसहाय्य मिळवण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत रितसर अर्ज करता येईल.

कोणत्या कोर्सेससाठी केले जाते अर्थसहाय्य

जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंटमधून स्पीच थेरिपीमध्ये मास्टर्स इन सायन्स, बी.एड, डी.एड, स्पेशन एज्युकेशनमध्ये एम.एड, मेडिकल सायन्स आणि हेल्थकेअरमधील अंडर ग्रॅज्युएट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांना, न्यूरोसायन्स विषयात मास्टर्स करणाऱ्यांना यातून अर्थसहाय्य केले जाते. त्याशिवाय एअरक्राफ्ट मेंटेनन्ससाठी देखील जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंटमधून अर्थसहाय्य केले जाते.

आतापर्यंत अनेक स्कॉलर्सनी घेतला या उपक्रमाचा लाभ

जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट अंतर्गत देशातील अनेक बड्या स्कॉलर्सने लाभ घेतला आहे. जेएन टाटा स्कॉलर्समध्ये माजी राष्ट्रपती के.आर नारायणन,खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉ. राघवेंद्र राव, डॉ. दिनानाथ रांगणेकर, डॉ. बाळ टिळक, राजीव दुबे, जयराम रमेश यासारख्या स्कॉलर्सने जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंट अंतर्गत लाभ घेतला आहे. 

जमशेटजी नुसरवानजी टाटा एन्डॉव्हमेंटसाठी पात्रता काय 

- टाटा ट्रस्टच्या वेबसाईटनुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यासाठी अर्ज करता येईल. 
- मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. 
- इथ विद्यार्थी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जात नाही. 
- एकाच कुटुंबातील दोन मुले या स्कॉलरशीपसाठी अर्ज करु शकतात.
- ज्यांच्याकडे वार्षिक शुल्काची रिसिप्ट असेल ते विद्यार्थी अर्ज करु शकतात. 
- याबाबत एक नमुना अर्ज भरावा लागेल. 
- वर्ष 2022-23 ची गुणपत्रिका आवश्यक आहे. 
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. 
- ITR किंवा फॉर्म 16, कंपनीची सॅलरी स्लीप सादर करता येईल.
-  igpedu@tatatrusts.org या ई-मेलवर अर्ज करता येईल.