Loan On Insurance Policy: आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता प्रत्येकाला महत्त्वाची वाटते. यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्याचा विमा काढण्यास धडपडत असतो. नागरिकांचा हाच दृष्टीकोन विमा कंपन्यांचा व्यवसाय बनतो. कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी आधी विमा घेणे आणि कुटुंबाच्या प्रत्येक गरजेची, मागणीची पूर्तता करण्यासाठी कर्ज घेणे ही आजकाल प्रत्येक माणसाची सवय झाली आहे. तेव्हा तुमच्याकडे जर का लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तुम्ही त्या पॉलिसीवर सहज आणि कमी व्याजदरावर कर्ज घेऊ शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, या कर्जाची पूर्तता न केल्यास तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते. आणि त्याचा कुठलाही लाभ त्यानंतर तुम्हाला मिळणार नाही.
Table of contents [Show]
कर्जाची रक्कम आणि सरेंडर मूल्य
ज्यांना कर्ज हवे आहे; त्यांना बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत (NBFC) पॉलिसीवर कर्ज घेता येते. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते. साधारणपणे एक अंदाज काढल्यास, कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80 ते 90 टक्के असू शकते. तुमच्याकडे मनी बँक किंवा एंडोमेंट पॉलिसी असेल, तेव्हा पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80 ते 90 टक्के इतके पैसे उपलब्ध होतील.
सरेंडर मूल्य म्हणजे काय?
जर तुमची आयुर्विमा पॉलिसी परिपक्व (mature) होण्याआधीच तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर केली, तर तुम्ही पॉलिसी अंतर्गत भरलेल्या प्रीमियममधून काही शुल्क वजा केल्यावर काही पैसे परत मिळतात आणि या रकमेला सरेंडर केले जाते, त्याला सरेंडर मूल्य म्हणतात.
या कर्जावर व्याजदर किती?
तुम्हाला मिळणारे कर्ज हे तुमच्या प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असते. जीवन विम्यावरील कर्जाचा व्याजदर 10 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान असते.
कर्जाची परतफेड करणे आवश्यक
पॉलिसीधारकाला पॉलिसीवर घेतलेल्या कर्जावरील व्याजाव्यतिरिक्त प्रीमियम भरणे देखील आवश्यक आहे. कर्जाची परतफेड करण्यास किंवा प्रीमियम भरण्यास चूक झाल्यास, तुमची विमा पॉलिसी संपुष्टात येईल. कारण विमा कंपनीला पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूमधून मुद्दल आणि थकबाकी व्याजाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे.
कर्ज घेण्यासाठी काय करावे
जीवन विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवन विमा पॉलिसीची सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लगतील. कर्जाच्या रकमेसाठी कर्जदाराला फॉर्मसह बँकेचा कॅन्सल चेक सुध्दा सोबत जोडावा लागेल.