यूट्यूबवर जास्तीत जास्त सबस्क्रायबर (Subscribers) मिळवणं, वॉचिंग टाइम (Watching time) जास्तीत जास्त असावा यासाठी यूट्यूबर कष्ट घेत असतात. नवनवीन युक्त्या वापरतात. काही जणांना त्यात यश येत मात्र काही जणांना ते जमत नाही. त्यामुळे याचा परिणाम पैसे मिळवण्यावर होत असतो. मात्र आता 500 सबस्क्रायबर होऊनही कमाई होणार आहे. यूट्यूबनं (YouTube) आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवणाऱ्यांच्या कमाईचं एक नवं साधन आणलं आहे. त्यामुळे आता तुम्ही नवीन असाल किंवा अनुभवी, यूट्यूब तुम्हाला तुमच्या व्हिडिओंसाठी पैसे देणार आहे.
Table of contents [Show]
काय आहे नवी पॉलिसी?
यूट्यूबवर पैसे कमवण्याची प्रोसेस आणखी सोपी झाली आहे. यूट्यूब चॅनलद्वारे पैसे कमवण्यासाठी चॅनलवर लाखो सबस्क्रायबर्स असावेत, असं काही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूट्यूब चॅनलवर यूझरचे 500 सबस्क्रायबर्स असले तरी चॅनलच्या माध्यमातून कमाई केली जाऊ शकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला भरपूर व्हिडिओ टाकावे लागतील, असंही काही नाही. यूट्यूबच्या नवीन पॉलिसीनुसार, 90 दिवसांत 3 व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवता येणार आहेत.
वायपीपी प्रोग्राम
90 दिवसांत 3 व्हिडिओ अपलोड करण्यासह एका वर्षात 3000 तास वॉचिंग टाइम किंवा 90 दिवसांत 30 लाख शॉर्ट्स व्ह्यूजदेखील मिळवता येतात. आधी मात्र यासंदर्भातले नियम अधिक कठोर होते. यूट्यूबनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की गेल्या वर्षी आम्ही सांगितले होतं, की आम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसोबत (YouTube Partner Program -YPP) पार्टनरशीप करत आहोत. जेणेकरून आम्ही क्रिएटर्सना पैसे कमवण्यासाठी मदत करू शकू. अलीकडेच आम्ही वायपीपी (YPP) एलिजिबिलिटीला एक्सपांड केलं आहे. जेणेकरून आम्ही त्यात शॉर्ट्स क्रिएटर्स जोडू शकू.
more opportunities for more creators ? check out updates to the YouTube Partner Program!! https://t.co/y4Nn7D6m6X
— YouTube (@YouTube) June 13, 2023
कोणत्या देशांमध्ये नवीन सेवा?
यूट्यूब ही नवीन वायपीपी सेवा यूएस, यूके, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये आणत आहे. लवकरच ही सेवा सर्व देशांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतातलं मार्केट पाहता लवकरच ही सुविधा आपल्याकडेही येणार आहे.
स्वतःच्या उत्पादनांची जाहिरातही करू शकणार
या सुविधेसाठी पात्र असलेले क्रिएटर्स वायपीपीसाठी अर्ज करू शकतात. जेव्हा ते 500 सबस्क्रायबर्सचा आकडा पार करतील आणि 90 दिवसांच्या आत 3 पब्लिक अपलोड करतील. किंवा त्यांचा व्हिडिओ 3000हून अधिक लोकांनी पाहिला असेल किंवा शॉर्ट्सला 90 दिवसांत 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असतील. नवीन पार्टनर्स फॅन फंडिंगसाठी मेंबरशीप, सुपर चॅट, सुपर स्टिकर्स, सुपर थँक्स यांसारख्या चॅनेलच्या अॅक्सेसला अनलॉक करतील. यामुळे यूझर्स यूट्यूब शॉपिंगच्या माध्यमातून स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करू शकतील.
कुठल्या क्रिएटर्सना फायदा?
सध्या ज्या देशांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे, तिथले क्रिएटर्स या वायपीपीसाठी अर्ज करू शकतात आणि फायदे अनलॉक करू शकतात. जेणेकरून ते खरेदी दरम्यान उत्पादनाची जाहिरात करू शकतील आणि फंडिंग फीचरचा लाभ घेऊ शकतील. दरम्यान, भारतातल्या क्रिएटर्सना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.