Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

DroneAcharya Aerial

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

 DroneAcharya Aerial  ही पुण्यातील एक स्टार्टअप कंपनी असून या छोटाशा कंपनीने गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. २३ डिसेंबर,२०२२ रोजी या कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग झालं होतं. यात सिने अभिनेते आणि इतर गुंतवणूकदारांनी देखील गुंतवणूक  केली आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून या कंपनीचं शेअर बाजारात लिस्टिंग झाले आहेत, तेव्हापासून दररोज अपर सर्किट लागतं आहे.  

DroneAcharya Aerial या कंपनीत बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा आयपीओ येण्याआधीच आमीर, रणबीरने ही गुंतवणूक केली होती.  

रिपोर्ट्सनुसार, DroneAcharya Aerial मध्ये बॉलिवूड अभिनेता आमीर खानने २५ लाख रुपयांत ४६,६०० शेअर खरेदी केले होते. तर रणबीर कपूरने २० लाख रुपयांत ३७,२०० शेअर खरेदी केले होते. IPO आधी सर्व गुंतवणुकदारांनी ५३.५९ रुपये प्रति शेअरच्या दराने या कंपनीत गुंतवणूक केली होती. या दोन्ही अभिनेत्यांच्या गुंतवणुकीची रक्कम तिप्पट झाली आहे.