• 28 Nov, 2022 17:43

Drive in 2022, Pay in 2023: होंडाची स्पेशल स्कीम, 2022 मध्ये कार खरेदी, 2023 मध्ये EMI!

Honda Drive in 2022, Pay in 2023

Image Source : www.hondacarindia.com

Honda Drive in 2022, Pay in 2023 :होंडा कंपनीने दोन निवडक कारच्या खरेदीवर अमॅजिंग ऑफर आणली आहे.

Honda Cars India फेस्टिव्हल सिझनमध्ये होंडा कंपनीने आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. कंपनीने यासाठी Drive in 2022, Pay in 2023 या नावाने एक नवीन ऑफर (Honda Cars Offer) आणली आहे आणि ही ऑफर 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंतच लागू असणार आहे.

होंडा कार कंपनीने ही ऑफर एका स्पेशल फायनान्स स्कीम अंतर्गत आणली आहे. यासाठी कंपनीने कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेडसोबत भागीदारीमध्ये आणली आहे. होंडा ही स्पेशल योजना होंडा अमेज आणि होंडा सिटी (Honda Amaze & Honda City) या कारवर आणली आहे.

होंडा कंपनीच्या या स्पेशल फायनान्स स्कीमनुसार, कंपनी होंडा अमेज (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) या दोन्ही कारच्या खरेदीवर ग्राहकांना ही ऑफर देत आहे. ज्याद्वारे ते 2022 मध्ये या कार खरेदी करू शकतात आणि याचा मासिक हप्ता मात्र 2023 पासून सुरू होईल.

होंडा अमेज (Honda Amaze)

Honda Amaze

होंडा अमेज ही मिड रेंजमध्ये येणारी सेडाना कार आहे. याची डिझाईन आणि मायलेज ही ग्राहकांना विशेष पसंत पडते. कंपनीने या कारचे तीन ट्रीम मार्केटमध्ये आणले आहेत. होंडा अमेजची बेसिक किंमत 6.63 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्यातील टॉप मॉडेलची किंमत 11.50 लाखांपर्यंत आहे.

होंडा अमेजची वैशिष्ट्ये (Features of Honda Amaze)

होंडा अमेजमध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 90 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. याचे दुसरे इंजिन 1.5 लीटरचे डीझल इंजिन आहे. जे 100 पीएसची पॉवर आणि 200 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. या दोन्ही इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय दिला गेला आहे.

होंडा सिटी (Honda City)

Honda city BEST LUXURIOUS INTERIOR

होंडा सिटी ही सेदान सेंगमेंटमधील प्रीमियम कार आहे. तिची डिझाईन, केबिन स्पेस आणि फीचर्ससाठी तिला अधिककरून पसंती दिली जाते. कंपनीने आतापर्यंत या कारचे तीन ट्रिम मार्केटमध्ये आणले आहेत. होंडा सिटी सेदानच्या बेसिक मॉडेलची किंमत 11.57 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 15.52 लाखांपर्यंत जाते.

होंडा सिटी कारची वैशिष्ट्ये (Features of Honda City)

कंपनीने या कारमध्ये सुद्धा दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. एक इंजिन 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असून जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. तर दुसरं इंजिन 1.5 लीटरचे डिझेल इंजिन सून 100 पीएसची पॉवर आणि 200 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. या दोन्ही इंजिनसोबत 6 स्पीड गिअरबॉक्स आणि 7 स्पीड सिव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.