Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card : आधार कार्ड एक्सपायर होतं का? एक्सपायर झाल्यास काय केले पाहिजे? जाणून घ्या सविस्तर

Aadhar Card

Aadhar Card Expire : आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र म्हणून वापरले जात आहे. याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमचे आधार कार्ड एक्सपायर झाले तर तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकते, परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण एक्सपायर झालेले आधार कार्ड देखील रिन्यू केले जाऊ शकते.

Aadhar Card : आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र म्हणून वापरले जात आहे. याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमचे आधार कार्ड एक्सपायर झाले तर तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकते, परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण एक्सपायर झालेले आधार कार्ड देखील रिन्यू केले जाऊ शकते.

अनेकांना माहिती नसेल की, आधार कार्डची एक्सपायरी डेट देखील आहे, जी UIDAI या आधार तयार करणाऱ्या संस्थेने निश्चित केली आहे. UIDAI द्वारे विविध प्रकारचे आधार कार्ड बनवले जातात, ज्यामध्ये नवजात मुलांसाठी ब्लू आधार कार्ड, 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे आधार कार्ड, 5 ते 15 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आधार कार्ड आणि प्रौढांसाठी आधार कार्ड बनवले जाते. 

आधार कार्डे वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड वेळेवर अपडेट केले नाही तर ते एक्सपायर होईल. तुम्ही ही कार्डे एक्सपायर झाल्यानंतरही त्यांचे नूतनीकरण करू शकता.आधार एक्सपायर झाल्यास आपले बायोमेट्रिक डिटेल्स मॅच होणार नाही. त्यामुळे आपली अनेक कामे थांबली जावू शकतात. उदा. काही वेळा बँकमध्ये आपल्याला विचारले जाते की, आधार कार्ड अपडेट केले का? करणे गरजेचे आहे. 

आधार कार्ड कधी एक्सपायर होते? 

जर मुलांसाठी ब्लू आधार कार्ड बनवले असेल तर ते 5 वर्षांनी एक्सपायर होईल. त्याचबरोबर, 5 वर्षे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी तयार केलेले आधार अपडेट न केल्यास ते इनअॅक्टिव  केले जाते. यामध्ये बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, प्रौढांसाठी, आधार कार्ड आयुष्यभर सारखेच राहते. पत्ता, क्रमांक किंवा इतर कोणतीही महत्त्वाची माहिती बदलल्यास, आपण ते अपडेट करू शकता. जर तुम्ही प्रौढ असाल तर तुमच्या नावाने जारी केलेले आधार कार्ड कायमचे व्हॅलिड असेल. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड अवैध ठरते.

एक्सपायर आधार कार्डला रिन्यू कसे करावे? 

जर तुम्हाला एक्सपायर झालेले आधार कार्ड रिन्यू करायचे असेल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल. UIDAI फक्त 5 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यास सांगते. बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स फिंगरप्रिंट, डोळे आणि फोटो अपडेट केले जातील. 

यासोबतच जर नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट नसेल तर तुम्ही तेही अपडेट करू शकता. सर्व माहिती दिल्यानंतर, काही दिवसांत तुमचे आधार कार्ड रिन्यू केले जाईल, जे तुम्ही कुठेही वापरू शकाल. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि रिन्यू करण्यासाठी 100 रुपये चार्ज केले जाते. त्याची रीतसर पावती दिली जाते. त्यावरूनच तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू शकता. 

आधार कार्डची व्हॅलिडिटी कशी चेक करायची? 

  •  UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवर दिलेल्या आधार सेवांच्या पर्यायावर जा.
  • आता "Verify Aadhar number" पर्यायावर जा.
  • तुम्ही त्यावर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.
  • येथे तुमचा आधार क्रमांक टाका.
  • security कोड समाविष्ट करा
  • त्यानंतर verified करा वर क्लिक करा.
  • त्याचे स्टेटस तुमच्या मोबाईलवर येईल.

Source : www.india.com/hindi-news