Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या नवी तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Free Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या नवी तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Image Source : www.saamtv.com

Free Aadhaar Update: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज असलेलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता आणखी कालावधी मिळणार आहे. 15 जूनपर्यंत आधार कार्डातले अपडेट विनामूल्य करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं आधार कार्ड मोफत अपडेट (Free Aadhaar Update) करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवली आहे. यूआयडीएआयमार्फत (Unique Identification Authority of India) जारी केलं जाणारं हे एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. त्यात अपडेट करण्यासाठी सरकारनं 14 जून 2023पर्यंत मुदत दिली होती. तसं तर आधारा कार्डात कधीही अपडेट करता येईल. मात्र विनामूल्य सुविधा मात्र नाही. आता विनामूल्य करण्यासाठी सरकारनं आधी 14 जून ही तारीख निश्चित केली होती. मात्र अनेकांना अपडेट करता आलं नाही. त्यामुळे आता ही मुदत आणखी काही दिवसांसाठी वाढवून देण्यात आली आहे. एबीपी लाइव्हनं हे वृत्त दिलंय.

तीन महिन्यांनी मुदत वाढ

आधारमधले अपडेट आता तुम्ही 14 सप्टेंबर 2023पर्यंत करू शकता. म्हणजे आणखी तीन महिने वाढवून देण्यात आले आहेत. हे अपडेट ऑनलाइन पद्धतीनं तुम्हाला करता येणार आहेत. 14 सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत तुम्ही ओळखपत्र, पत्ता पुरावा आधार कार्डसंबंधीत अपलोड करू शकता, अशी माहिती यूआयडीएआयनं दिली आहे.

सीएससीवर अपडेट सशुल्क

यूआयडीएआयच्या वेबसाइटवर या विनामूल्य अपडेटसंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार, आधार कार्डची माहिती अचूक ठेवण्यासाठी तुमचे डेमोग्राफिक डॉक्यूमेंट्स अपलोड करावे आणि आधार कार्ड अपडेट करावं. तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. त्याचबरोबर सीएससी केंद्रावर (Common Service Centres) जाऊनदेखील तुम्हाला तुमचं आधार अपडेट करता येईल. मात्र त्याठिकाणी तुम्हाला 25 रुपये शुल्क भरावं लागेल.

'या' गोष्टी आवश्यक

यूआयडीएआयनं जारी केलेल्या या पोर्टलवर आधार कार्डमध्ये पत्ता, नाव इत्यादी माहिती अपडेट करता येवू शकणार आहे. त्यासाठी यूझर्सना आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. मोबाइल नंबरवर ओटीपीद्वारे तुम्ही पत्ता आणि इतर गोष्टी बदलू शकता.

आधार कार्ड अपडेट मोफत सेवा कशी वापरायची?

रहिवासी त्यांचा आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/portal या संकेतस्थळावर लॉग इन करून मोफत आधार अपडेट करू शकतात. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.

यूझर्सनी ‘Document Update’वर जावं. त्यांचे डिटेल्स व्हेरिफाय करून घ्यावे. त्यांची माहिती रिव्हॅलिडेट करण्यासाठी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करणं गरजेचं आहे.
आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत, ते पाहू...

  • आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जावे आणि 'proceed to update address' ऑप्शनवर क्लिक करावं.
  • आधार क्रमांक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आणि ओटीपी वापरून लॉग इन करावं.
  • व्हॅलिड अ‍ॅड्रेस प्रूफच्या बाबतीत 'Proceed to Update Address'वर क्लिक करा.
  • 12 अंकी आधार क्रमांक एंटर करावा आणि 'Send OTP'वर क्लिक करावं.
  • ओटीपी एंटर करा आणि आधार अकाउंट लॉग इन करा.
  • 'update address via address proof' ऑप्शन निवडल्यानंतर नवीन पत्ता एंटर करा. 'Update Address vis Secret Code' हा ऑप्शनही वापरता येईल.
  • 'Proof of Address'मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता एंटर करा.
  • आता, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाचा कागदपत्राचा प्रकार निवडा.
  • पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी आणि 'Submit' बटणावर क्लिक करावं.
  • आधार अपडेट रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली जाईल आणि 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट क्रमांक (URN) जनरेट केला जाईल.