Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bonus in Insurance: लाईफ इन्शुरन्समधील बोनसचे प्रकार तुम्हाला माहित आहेत का?

Bonus in Life Insurance

What is Bonus in Life Insurance: बोनस या शब्दाचा थेट अर्थ म्हणजे अतिरिक्त मिळणारी रक्कम. इन्शुरन्स कंपनी काही वेळा पॉलिसीधारकाला पॉलिसी खरेदीचा विशिष्ट टप्पा पूर्ण केल्यानंतर पॉलिसीचे अतिरिक्त फायदे म्हणजे “ॲड ऑन रायडर” (Add on Rider) म्हणून बोनसची रक्कम देत असते.

Types of Bonuses in Life Insurance: लाईफ इन्शुरन्स आणि बोनस पण!!! सर्वसाधारणपणे इन्शुरन्स पॉलिसी म्हटले की प्रीमियमचा भरणा, पॉलिसी लॅप्स / बंद होणे किंवा झालेच तर क्लेमची सेटलमेंट होणे इत्यादी!!! इन्शुरन्स संबंधी सर्वसामान्य समज असलेल्या याच संकल्पना आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी देखील बोनसची रक्कम मिळण्याचा लाभ देऊ शकते.

लाईफ इन्शुरन्समध्ये बोनस काय आहे? | What is Bonus in Life Insurance?

“बोनस” अर्थात अतिरिक्त मिळणारी रक्कम. इन्शुरन्स (Insurance) कंपनी काही वेळा पॉलिसीधारकाला पॉलिसी खरेदीचा विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर पॉलिसीचे अतिरिक्त फायदे म्हणजे “ॲड ऑन रायडर” (Add on Rider) म्हणून बोनसची रक्कम देते. काही वेळा ही रक्कम पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी मिळते तर काही वेळा पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास बोनसची रक्कम अदा केली जात असते. बोनसची ही रक्कम पॉलिसीच्या निर्धारित रक्कमेच्या म्हणजे Sum Assured पेक्षा वेगळी असते.

बोनस ही इन्शुरन्सच्या रक्कमेची ठराविक टक्केवारी असते आणि ती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी घोषित केली जाते. बोनसचा दर किती असावा, हा अधिकार मात्र इन्शुरन्स कंपनी स्वतःकडे राखून असते. म्हणून बोनसची रक्कम निश्चित केलेली नसते. आणि सर्वच लाईफ इन्शुरन्स पॉलिसींना बोनसची रक्कम मिळत नसते. केवळ “नफ्यासह सहभागी स्वरूपाच्या पॉलिसीज्” असणारे पॉलिसीधारक बोनस मिळण्यासाठी पात्र असतात.

इन्शुरन्समधील बोनसचे वेगवेगळे प्रकार (Types of Bonus in Insurance)

रिव्हर्शनरी बोनस अर्थात प्रत्यावर्ती बोनस (Reversionary Bonus)

हा बोनस प्रत्येक सहभागी पॉलिसीला वाटप केलेला नफा असतो आणि तो सहसा प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी घोषित केला जातो. “रिव्हर्शनरी बोनस” पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर किंवा डेथ क्लेम (अर्थात पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरचा विमा रकमेचा दावा) रकमेसोबत पॉलिसीधारकाला किंवा नॉमिनीला देय असलेल्या रकमेसोबत एकदम अतिरिक्त लाभ म्हणून दिला जातो.

रिव्हर्शनरी बोनसचे सामान्यतः 2 प्रकार आहेत (Two Types of Reversionary Bonus)

सिम्पल रिव्हर्शनरी बोनस (Simple Reversionary Bonus)

हा बोनस दरवर्षी विम्याच्या रक्कमेच्या टक्केवारीच्या स्वरूपात घोषित केला जातो. म्हणजेच जर बोनस प्रति हजाराला 50 रुपये असेल आणि पॉलिसीची रक्कम 5 लाख रुपये असेल तर बोनसची रक्कम 25 हजार रुपये असते.

कंपाऊंड रिव्हर्शनरी बोनस (Compound Reversionary Bonus)

हा बोनस चक्रवाढ पध्द्तीने मोजला जातो. त्यामुळे प्रत्येक वर्षाचा बोनस विम्याच्या रकमेत जोडला जातो आणि पुढील वर्षाचा बोनस एकूण रकमेवर मोजला जातो. 

अंतरिम बोनस (Interim Bonus)

बोनस साधारणपणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस घोषित केले जातात. मात्र 31 मार्चच्या नंतर परंतु रिव्हर्शनरी बोनस घोषित होण्यापूर्वीच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यास किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अंतरिम बोनस दिला जातो. हा शेवटचा बोनस शेवटच्या बोनस तारखेपासून उर्वरित दिवसांकरिता मोजला जातो.

टर्मिनल बोनस (अंतिम बोनस) | Terminal Bonus (Final Bonus)

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा करार संपताना (म्हणजेच पॉलिसी मॅच्युअर्ड होऊन किंवा डेथ क्लेम (Policy Matures or Death Claim)) दिल्या जाणाऱ्या रक्कमेसोबत दिला जातो. हा बोनस अर्थातच पॉलिसीच्या कराराच्या कालावधीवर अवलंबून असतो.

कॅश बोनस (रोख बोनस) | Cash Bonus (Cash Bonus)

एका वर्षात जमा झालेला रोख बोनस आर्थिक वर्षाच्या शेवटी रोख स्वरूपात दिला जातो. हा बोनस ठराविक कालावधी पूर्ण झाल्यावर नव्हे तर वार्षिक आधारावर देय असतो.

लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना नेहमी कव्हरेजची रक्कम, पॉलिसी टर्म, प्रीमियम भरावयाचा प्रत्यक्ष कालावधी यांच्यासोबत पॉलिसीमधील बोनस म्हणजे अतिरिक्त नफ्याचा देखील विचार केला तर अधिक सुयोग्य निर्णय घेण्यास मदत होते.