• 04 Oct, 2023 11:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Gold : 24 कॅरेट सोनं ऑनलाईन कसे खरेदी करायचे?

Digital Gold

डिजिटल सोनं ही एक अशी पद्धत आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डिजिटली कधीही आणि कुठेही कमी प्रमाणातसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Digital Gold : भारतातील नागरिकांचं सोन्याबाबत एक भावनिक नातं जोडलेलं आहे. पण त्यात आता हळुहळू बदल होताना दिसून येत आहे. काही प्रमाणात आता लोकं डिजिटल स्वरूपात सोनं विकत घेऊ लागली आहेत. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर होऊ लागला आहे आणि सध्या ती काळाची गरजसुद्धा आहे. त्यामुळे डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पारंपरिक स्वरूपात वापरलं जाणारं भौतिक स्वरूपातलं सोनं आता डिजिटल स्वरूपात गुंतवणुकीसाठी विचारात घेऊ लागलं आहे. तुम्ही सुद्धा डिजिटल पद्धतीने सोनं खरेदी आणि विक्री करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही येथे काही पर्याय घेऊन आलो आहोत.

डिजिटल पद्धतीने सोनं खरेदी करायचं म्हणजे काय?

डिजिटल सोनं ही एक अशी पद्धत आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डिजिटली कधीही आणि कुठेही कमी प्रमाणातसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. 
डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे विविध प्रकार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bonds-SGB)

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड ही रिझर्व्ह बँक इंडिया (RBI) द्वारे राबवली जाणारी सोनं गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदार कमीतकमी 1 ग्रॅम सोन्याची खरेदी करू शकतो. आरबीआय ठराविक कालावधीकरीता ही योजना सुरू ठेवते. या योजनेबाबत आरबीआय वेळोवेळी जाहिरातींद्वारे सॉव्हरिन गोल्ड बॉण्डच्या विक्रीच्या तारखा जाहीर करत असते.

गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड (Gold Exchange Traded Fund- Gold ETF)

गोल्ड ईटीएफ हे स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड केलेले फंड आहेत आणि ते इक्विटी म्युच्युअल फंडासारखेच असतात. गोल्ड ईटीएफचे प्रत्येक युनिट एक ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करत असते. हे सोनं 99.5 टक्के शुद्धतेचे असते. हे सोनं गुंतवणूकदाराच्या नावाने डिपॉझटरीजमध्ये साठवले जाते आणि त्या बदल्यात गुंतवणूकदाराला त्याचे मूल्य म्हणून युनिट्सचं वाटप केलं जातं. गुंतवणूकदार ते युनिट्स विकून प्रत्यक्ष सोनं मिळवू शकतो. गोल्ड ईटीएफ विकणारे बरेच फंड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

एमसीएक्स गोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स (MCX Gold Contracts)

MCX गोल्ड कॉन्ट्रॅक्ट्सद्वारे भारतात सोन्याची अधिकृतरीत्या खरेदी व विक्री करता येते. या प्लॅटफ़ॉर्मवर केलेल्या सोन्याची खरेदी-विक्रीला सरकारची मान्यता आहे. अर्थात यासाठी काही नियम सुद्धा आहेत. या मार्केटमध्ये गुंतवणूकदार शेअर मार्केटप्रमाणे ट्रेडिंगसुद्धा करू शकतात. MCX वर विविध वस्तुंचा व्यापार होतो. सोनं हे त्यापैकी एक आहे. इथे किमान 1 ग्रॅम सोन्याची खरेदी-विक्री करता येते.

डिजिटल गोल्ड संस्था (Digital Gold Organizations)

Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मनी सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यातील काही प्लॅटफॉर्मवर किमान 1 रुपयात डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते.

डिजिटल क्रांतीमुळे लोकांच्या आवडी-निवडीमध्येसुद्धा फरक पडायला लागला आहे. प्रत्यक्ष सोनं विकत घेण्याऐवजी लोकांचा कल डिजिटल सोन्याकडे वाढू लागला आहे. यासाठी नवनवीन प्लॅटफॉर्मसुद्धा उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष सोनं बाळगण्याची रिस्क कमी करून त्याबदल्यात गुंतवणूकदारांना तितक्याच मुल्याचं सोनं डिजिटली विकत घेता येत आहे.