Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ (Gold ETF) पर्याय निवडा आणि मिळवा फायदा

भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ (Gold ETF) पर्याय निवडा आणि मिळवा फायदा

Image Source : www.bankrate.com

सोन्यात गुंतवणूक करणे हा नेहमीच भारतीयांचा आवडता पर्याय राहिला आहे. बदलत्या काळानुसार, भौतिक सोन्यात पैसे गुंतवण्याबरोबरच डिजिटल स्वरूपातही गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 गोल्ड ईटीएफबद्दल सांगणार आहोत.

भारतात मार्च 2007 पासून गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) वर व्यवहार केले जात आहेत. बेंचमार्क अॅसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडे गोल्ड ईटीएफसाठी प्रस्ताव ठेवणारी पहिली कंपनी होती.

भारतातील गोल्ड ईटीएफ योजना Gold ETF Scheme in India

भारतातील स्टॉक एक्स्चेंजमध्ये गोल्ड ईटीएफचा व्यापार सुरू झाल्यापासून अनेक कंपन्यांनी गोल्ड ईटीएफ योजना सुरू केल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या आणि चांगला परताव्या देणाऱ्या योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना काही घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याबद्दल ही आपण माहिती घेणार आहोत.

योग्य ईटीएफ योजना निवडणे : गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड योजनांचा नफा किती होत आहे. हे योजनेच्या गुंतवणूक प्रोफाइलमधून आपल्याला कळू शकते. त्यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना चांगला परतावा देणारी कंपनी निवडणे महत्त्वाचे असते.

कंपनीची व्यवस्थापकीय मालमत्ता (AUM) : अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) ही संकल्पना कंपनी व्यवस्थापित करत असलेल्या सर्व आर्थिक मालमत्तेचे बाजार मूल्य दर्शवित असते. एखाद्या कंपनीचे AUM मूल्य जास्त असेल, तर ते ग्राहकांच्या आणि पोर्टफोलिओमधील मोठ्या संख्येमधून दिसते.

नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) : NAV हे कंपनीच्या मालमत्तेचे मूल्य आहे. हेच ETF च्या प्रति शेअरची किंमत असते. आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्व सिक्युरिटीजचे एकूण मूल्य, दायित्वे (liability) वगळता, उरलेल्या फंड समभागांच्या संख्येने विभाजित करून NAV काढला जातो.

परतावा (Returns) : ईटीएफ योजना किंवा पोर्टफोलिओद्वारे केलेला नफा किंवा उत्पन्नाला परतावा म्हणून ओळखले जाते.

2022 मधील भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ

भारतातील गोल्ड ईटीएफ योजनांमधील वेगवेगळ्या कंपन्यांचा परतावा पाहता कोणत्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं थोडे कठीण होऊ शकते. यासाठी, कंपनीचा एयूएम, एनएव्ही आणि परताव्याच्या आधारे विविध ईटीएफ योजनांचे प्रोफाइल पाहता गुंतवणूक करण्यासाठी कोणते ईटीएफ फायदेशीर ठरू शकतील अशा काही ईटीएफ योजनांची माहिती घेणार आहोत. ज्याची तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी मदत होऊ शकते.

5-best-gold-etf.jpg