Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023: पारंपरिक सोने खरेदी रोडावली; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्डला डिमांड?

Akshaya tritiya 2023

Akshaya Tritiya 2023: मागील वर्षभरात ग्राहकांसाठी सोने खरेदी महागली आहे. अक्षय्य तृतीयेला पारंपरिक पद्धतीने दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी राहू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, डिजिटल गोल्डची डिमांड वाढू शकते, अशी अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. डिजिटल गोल्ड अगदी कमी किंमतीचेही खरेदी करू शकतो. भाववाढ पाहता सोने खरेदीचा डिजिटल पर्याय ग्राहकांना भुरळ घालू शकतो.

Akshaya Tritiya 2023: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्डची मागणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किंमतींनी साठीचा टप्पा पार केल्याने दुकानात जाऊन सोने खरेदी करण्यास ग्राहक इच्छुक दिसत नाहीत. मात्र, अक्षयतृतीयेला सोने खरेदीला भारतीय महत्त्व देतात. त्यामुळे घरात आनंद, सुखशांती आणि समृद्धी येते असा पूर्वापार चालत आलेला विश्वास नागरिकांमध्ये आहे. जरी फिजिकल गोल्ड खरेदी करणे शक्य झाले नाही तरी डिजिटल स्वरुपात अगदी टोकन रकमेचे सोने खरेदी नागरिकांकडून केले जाऊ शकते. यावर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची दुकाने मागील वर्षीच्या तुलनेत कमी गजबजलेली दिसू शकतात, असे सुवर्ण व्यापाऱ्यांचेही मत आहे.

कमी किंमतीत डिजिटल गोल्ड खरेदी

उद्या (शनिवार) अक्षय तृतीया आहे. प्रति ग्रॅम सोने 62 हजारांवर गेले आहे. दरवाढीमुळे ग्राहकांना सोने खरेदी अवघड होऊन बसली आहे. मात्र, इतर पर्याय जसे की, डिजिटल गोल्ड खरेदीसाठी किंमतीची मर्यादा नाही. (Digital Gold demand On Akshaya tritiya) अगदी पाच-दहा रुपयांचेही सोने खरेदी करता येऊ शकते. मात्र, जर सोन्याच्या किंमतीत थोडीही घसरण झाली तरी दुकानात जाऊन सोने खरेदी वाढू शकते. सुवर्ण व्यापारी मजबूत सोने खरेदीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, अद्याप तसा प्रतिसाद बाजार दिसत नाही.

मागील वर्षी सोन्याचे दर किती होते?

दरवाढीमुळे मागील काही दिवसांपासून दुकानामधील गर्दी रोडावली आहे. (Akshaya Tritiya 2023) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर असे होणे अनपेक्षित आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 62 हजारांच्या पुढे गेला आहे. मागील वर्षी अक्षयतृतीयेला सोन्याचे दर सुमारे 14 टक्क्यांनी कमी होते. 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 53 हजार रुपये होता. तसेच कोरोना काळात दोन वर्ष नागरिकांनी सुवर्ण खरेदी केली नव्हती. ही दोन वर्षांची कसर मागील वर्षी ग्राहकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर भरून काढली होती. मात्र, यंदा परिस्थिती पुन्हा बदलली. एकाच वर्षात सोन्याचे दर सुमारे दहा हजारांनी वाढले.

indian-rupee-stock-rate.jpg

सौजन्य गुगल

गोल्ड इटीएफला पसंती का नाही?

"अक्षय तृतीयेला डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अल्प प्रमाणात का होईना, सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे. Digital Gold Demand) गोल्ड फंडमधील कर ररचनेतील बदलामुळे हे फंड जास्त आकर्षक राहीले नाहीत. त्याचा अप्रत्यक्ष फायदा डिजिटल गोल्ड खरेदी करण्यात होईल. मात्र, रितीरिवाजानुसार सुवर्णखरेदीला नागरिकांकडून खूप महत्त्व दिले जाते. थोडेही दर खाली आले तर दुकानांमध्ये गर्दी दिसू शकते, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम यांनी म्हटले. 

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमधील (ETFs) गुंतवणुकीवरील कररचनेत एप्रिलपासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) आणि इंडेक्शेशन बेनिफिट या गुंततवणुकीवर मिळणार नाही. मार्जिनल टॅक्स रेटनुसार या गुंतवणुकीवर कर आकारला जाईल, त्यामुळे इटीएफमधील गुंतवणुकीकडेही ओढा कमी राहू शकतो. दरम्यान, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

"सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल"

स्वेच्छेने दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल नाही. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे या अक्षयतृतीयेला सोन्याची मोठी मागणी राहील. ग्राहक गुंतवणूक आणि उपभोगासाठी सोनं खरेदी करतील अशी आशा आहे, असे मलबार गोल्डचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी म्हटले. भाववाढीबरोबरच पश्चिम बंगाल राज्यात उष्णतेची लाट आल्याने सोने खरेदी रोडावली. ज्या घरामध्ये लग्न समारंभ आहे, तेच सोने खरेदीसाठी येत आहेत. इतर नागरिकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, असे सिको गोल्डचे सुवनकार सेन यांनी म्हटले.