क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज तेजी दिसून आली आहे. आज बुधवारी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रमुख क्रिप्टो चलनांच्या किंमतीत वाढ झाली. बिटकॉइन, इथेरियम या चलनांच्या किंमतीत वाढ झाली. मागील 24 तासांत बिटकॉइनचा भाव 0.17% ने वाढला आणि तो 17040.82 डॉलर इतका झाला.
ग्लोबल क्रिप्टो मार्केटचे बाजार भांडवल 854.61 बिलियन डॉलर्स इतके वाढले आहे.त्यात आज 0.7% ने वाढली.मात्र उलाढाल 7.83% ने कमी झाली. कॉइनमार्केटकॅप या एक्सचेंजनुसार आज इथेरियमच्या किंमतीत देखील तेजी दिसून आली. इथेरियमचा भाव 0.07% ने वाढला आहे. तो 1229.91 डॉलर इतका झाला. तिथेरचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. त्याशिवाय बीएनबीच्या किंमतीत 0.15% वाढ झाली आहे. बीएनबी कॉइनचा भाव 284.13 डॉलर इतका आहे.
यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर असून बायनान्स कॉइनचा देखील 1.00 डॉलर इतका दर आहे. सोलानाचा भाव 13.70 डॉलर असून त्यात 0.74% वाढ झाली. लिटेकॉइनचा दर 76.76 डॉलर इतका आहे. पॉलकाडॉटचा भाव 5032 डॉलर इतका आहे.
आज मेमे कॉइन्सला चांगली मागणी दिसून आली. मेमे कॉइन्सचा भाव 0.59% ने वाढले. यात शिबू इनूच्या किंमतीत मात्र किंचित घसरण झाली. शिबू इनूचा भाव 0.28% ने कमी झाला आणि तो 0.000009 डॉलर इतका खाली आला. डोजकॉइनचा भाव 0.51% ने कमी झाला असून तो 0.100891 डॉलर इतका आहे. डोजलॉन मर्सचा भाव 4.72% ने कमी झाला आणि तो 3.47 डॉलर झाला.
गोल्डमन सॅक्स करणार क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गुंतवणूक
अमेरिकेतील FTX या क्रिप्टो एक्सचेंजचा डोलारा कोसळल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावा लागले होते. FTX प्रकरणाने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला होता. मात्र आता FTX घोटाळ्यातून क्रिप्टो मार्केट हळुहळू सावरत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील मोठी इव्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात क्रिप्टो गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.