क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा अनेक जण विचार करत असतात. यविषयीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. हा क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार कसा करावा, हे आता बघूया. या पाच पायऱ्या बघितल्यावर तुम्हाला हे व्यवहार कसे करायचे याचा बेसिक अंदाज येईल. मात्र क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीला भारतात कायदेशीर मान्यता नाही. ती अति जोखमेची गुंतवणूक आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेणे हिताचे राहील.
स्टेप 1 – क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहार करण्यासाठी सर्वात प्रथम एक क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. हा निवडाताना त्याची वैशिष्ट्ये, डीपॉझिट आणि विड्रॉल पद्धत अशा काही महत्वाच्या बाबींचा विचार करावा.
स्टेप 2 - यापुढची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला यासाठी पैसे जमा करावे लागतील. यामुळे तुम्ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करू शकाल. तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यातून ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जमा करण्यासाठी सोईस्कर अशी योग्य पेमेंट पद्धत निवडू शकता.
स्टेप 3 - मार्केटचा अभ्यास करा. संबंधित घडामोडी, बातम्या यावर लक्ष ठेवा. त्याला मार्केट कसा प्रतिसाद देत आहे, याविषयी विश्लेषण करा. यामुळे मार्केटमध्ये केव्हा प्रवेश करावा किवा यातून केव्हा बाहेर पडावे याचा निर्णय घेण्यासाठी मदत होईल.
स्टेप 4 – ही सर्व प्रक्रिया केल्यावर तुम्हाला कोणती क्रिप्टोकरन्सी निवडायची याचा निर्णय घ्यावा लागेल. यासाठी व्हाईटपेपर्स, संबंधित प्रोजेक्टच्या मागे असणारी टीम, तसेच अन्य तांत्रिक घटक या सर्व बाबी सुरुवातीला बघाव्यात. क्रिप्टोकरन्सीची निवड करण्यासाठी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस करणे महत्वाचे ठरते.
स्टेप 5 – ही सर्व प्रक्रिया केल्यावर तुम्ही क्रिप्टोकरन्सी करण्यासाठी सज्ज व्हाल. यानंतर तुम्ही कमीत कमी 10 डॉलर गुंतवून ही खरेदीला सुरुवात करू शकता.