Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crude Oil Price : क्रूडचा भाव लवकरच 100 डॉलरवर जाणार, भारतासाठी धोक्याचा इशारा

crude oil

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. हे तेजी कायम राहिली तर लवकरच क्रूडचा भाव 100 डॉलरवर जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

कोरोना संकटात शुन्याखाली गेलेल्या क्रूड ऑइलचा दर मागील वर्षभरात सावरला आहे. वर्ष 2023 क्रूड ऑइल मार्केटसाठी तेजीचे ठरेल, असे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव 80 डॉलरवर गेला होता. खनिज तेलाचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमधून तेलाची मागणी वाढल्यानंतर क्रूड ऑइलमध्ये तेजी दिसून आली. नजीकच्या काळात क्रूड ऑइलचा भाव 100 डॉलरवर जाईल, असे भाकीत करण्यात आले आहे. (Crude Oil Price May hit 100 Dollars) मात्र महागाईशी लढणाऱ्या भारतासाठी हा धोक्याचा इशारा ठरण्याची शक्यता आहे. सरकारचा वित्तीय तूट नियंत्रणात (Fiscal Deficit) ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल. (

ओपेक आणि आयईए या दोन्ही संस्थांनी क्रूडच्या मागणीसंदर्भात नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वर्ष 2023 मध्ये क्रूडची मागणी वाढेल, असा अंदाज दोन्ही संस्थांनी वर्तवला आहे. चालू वर्षात जगभरातील क्रूडची मागणी दररोज 1.5 मिलियन बॅरल इतकी वाढेल, असा अंदाज या संस्थानी व्यक्त केला आहे. यात चीनकडून किमान 650000 बॅरल तेल खरेदी केले जाऊ शकते.

यापूर्वी वर्ष 2019 मध्ये क्रूड ऑइलची मागणी दररोज 100.6 मिलियन बॅरल इतकी होती. वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत अर्थचक्राने वेग घेतला तर क्रूडची मागणी देखील वाढण्याची शक्यता आहे. क्रूडमध्ये दरवाढ होत असल्याने कंपन्यांचे ऑइल रिफायनरी मार्जिन देखील वाढले आहे. यामुळे तेल आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील क्रूडचा साठा हा उच्चांकावर पोहोचला आहे. रशियाकडून देखील सुरळीत तेल पुरवठा होत आहे. त्यामुळे क्रूड ऑइलचा भाव 100 डॉलरचा टप्पा गाठू शकतो.

MCX वर क्रूड ऑइलमध्ये दिसू शकते तेजी

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजची आकडेवारी पाहिली तर क्रूड ऑइलचा मागील काही दिवसांतील ट्रेडिंग चार्ट RSI 14 हा 58 आहे. 50 दिवसांच्या सरासरी स्तरावर सध्याचा क्रूडचा भाव आहे. एमसीएक्सवर क्रूडसाठी 6800 चा स्तर असून वरच्या स्तरात तो 7100 वर जाऊ शकतो. मात्र याचवेळी 6700 चा स्टॉप लॉस देखील ठेवणे आवश्यक आहे.