Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Today's Petrol Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत 1.20 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Today's Petrol Diesel Rates

Today's Petrol Diesel Rates: 21 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Today's Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. आज सुद्धा (21 डिसेंबर)आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज नवीन तेलाच्या किमती अपडेट केल्या जातात. कच्च्या तेलाच्या किमतीत 1.20 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज दिल्ली आणि चेन्नईमध्ये (Delhi and Chennai) तेलाच्या किमती बदलल्या आहेत. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. 

प्रमुख शहरातील आजचे दर  (Today's rates in major cities)

शहर

पेट्रोल

डिझेल

दिल्ली

96.72

89.62

चेन्नई

102.63

94.24 

कोलकाता

106.03 

92.76

मुंबई

106.31 

94.27

नोएडा

96.65

89.82

लखनौ

96.57

89.76 

पाटणा

107.95

 94.70 

कालचे दर (Yesterday's rate)

एनसीआरमध्ये तेलाची किंमत देशाची राजधानी दिल्लीत काल (मंगळवार) एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol price) 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत (Diesel price) 89.62 होती. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 96.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रति लिटर होता.  याशिवाय नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 96.79 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 89.96 रुपये प्रति लीटर होती. गुरुग्राममध्ये पेट्रोलची किंमत 97.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 90.05 रुपये होती. देशातील प्रमुख तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर करतात. 

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल 21 मे रोजी झाला होता. सर्वसामान्यांची महागडी पेट्रोल-डिझेलच्या दरातून सुटका करण्यासाठी सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर आठ रुपये आणि डिझेलच्या दरात सहा रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून देशात त्याच्या किमती जवळपास स्थिर आहेत.