1) विराट कोहली: लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली हा Adidas व MRF यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच तो जगभरातील क्रिकेटर्सपैकी सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली वार्षिक 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरतो. विराट कोहलीने 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12809 धावा, 46 शतके आणि 64 अर्धशतके केली आहेत. याशिवाय विराट कोहलीने 104 कसोटी सामन्यांमध्ये 8119 धावा, 27 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत.
2) एमएस धोनी: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 2022-23 मध्ये झारखंड राज्यातील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती होत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने 17 कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरले होते. मागील वर्षीच्या सुरुवातीला, त्यांनी आगाऊ कर म्हणून 13 कोटी रुपये जमा केले होते आणि त्यानंतरही ते राज्यातील सर्वाधिक मोठा करदाता झाला.
3) सचिन तेंडुलकर: निवृत्त होऊनही सचिन तेंडुलकर अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सचिन तेंडुलकर जवळपास वार्षिक 19 कोटी रुपये टॅक्स भरतो. इतिहासात थोडे मागे जाऊन बघितले तर 2010 मध्ये सचिन तेंडुलकर हा देशातील सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू होता. सचिन तेंडुलकरने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18426 धावा, 49 शतके आणि 96 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या.
भारतात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचे भारतात आयोजन झाल्यास क्रिकेप्रेमीं तेथे आवर्जून उपस्थित राहतात या लोकप्रियतेमुळे
भारतातील क्रिकेटपटू मोठी कमाई करतात यामुळे त्यांना सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात टॅक्सच्या माध्यमातून पैसे जमा करावे लागतात.