Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cotton production: मागील वर्षीच्या तुलनेत कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही उत्पादनात घट..

Cotton production

Cotton production: इतर वर्षाच्या तुलनेत सन 2022-23 मध्ये कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही कापूस उत्पादनात घट दिसून येत आहे यावर अभ्यासकांचे काय मत? जाणून घेऊया.

Cotton production: सद्यस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी (Cotton farmers) काळजीत दिसून येत आहे. काळजी करण्यासारखी स्थिती हवामानाने त्यांच्या समोर उभी केली आहे. आधीच अवकाळी पावसाने पिकाला मोठा फटका दिला आहे आणि आता त्याचबरोबर कापसाचे भावही त्यांची चिंता वाढवत आहे. या वर्षी कापूस पेरणी क्षेत्र व्यापक असले तरीही उत्पादन मात्र त्या तुलनेत कमी दिसून येत आहे. उत्पादनात घट (Decrease in production) होण्याचे प्रमाण 35 टक्क्यांच्या वर आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. 

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार….. (According to estimates by Cotton Association of India….)

या हंगामात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, (Cotton Association of India,) जी उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीचे प्रतिनिधित्व करते, तिच्या पूर्वीच्या उत्पादनाचा अंदाज 4.25 लाख गाठींनी कमी करून 339.75 लाख गाठींवर आणला आहे. असोसिएशनच्या अंदाजानुसार 31.89 लाख गाठी आणि 12 लाख गाठींची अंदाजे आयात मिळून या हंगामात एकूण 383.64 लाख गाठी कापूस उपलब्ध होईल असा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. आणि आता यावर्षी देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार  असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, यावर्षी कापसाचे उत्पादन 290 ते 300 लाख गाठींवर स्थिरावणार अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली आहे.

सध्या कापसाचे दर किती? (How much is cotton currently?)

सध्या कापसाच्या दरात घसरण होत असल्याचे समजते. कापसाचे दर प्रति क्विंटल 8 हजार रुपयांच्या आसपासच रेंगाळत आहेत. शेतकरी आतुरतेने दर वाढीची वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे, दमट वातावरणामुळे तो खराब होण्याची शक्यता सुद्धा आहे. या अडचणीमुळे काही शेतकरी फसवणुकीचे बळी पडत आहे. यावर लवकरात उपाय काढण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

पेरणी क्षेत्र वाढलं मात्र, उत्पादनात घट (Sown area increased, but production decreased)

काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे, 15 जानेवारीनंतर जेव्हा आवक लक्षणीयरीत्या सुधारेल तेव्हाच वास्तविक किमतीचा कल दिसून येईल असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे. 15 जानेवारी ते मे-अखेर दरम्यान, जवळपास 80 टक्के आवक पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. देशभरात मागील वर्षीच्या तुलनेत 2022-23 मध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले आहे. त्यामुळं कापसाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजकडून केला जात आहे. मात्र,  हवामान बदलाचा मोठा फटका कापसाच्या पिकाला बसल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्रासह आणखी कोणत्या राज्यात कापूस उत्पादन कमी….. 

अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसल्याने पाहिजे तसे उत्पन्न झालेले नाही. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला मोठा फटका बसल्याची माहिती मिळाली आहे. काही राज्यांमध्ये गुलाबी बोंडअळीमुळं पिकाला फटका बसला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान या छोट्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंडअळीमुळं कापसाचे उत्पादन कमी झाल्याच अभ्यासकांनी म्हटल आहे.