शेअर बाजाराचे लाभ मिळवण्याचा एक लोकप्रिय झालेला मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. यामध्ये आपले पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मुच्युअल फंड स्कीमची निवड करताना अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. यामधील कॉंट्रा फंड वि. म्युचुअल फंड यामध्ये काय चांगले आहे याविषयी चर्चा आपण करणार आहोत. (Contra Fund or Value Fund : Which Is Better?) यासाठी सगळ्यात आधी कॉंट्रा फंड आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय ते जाणून घेऊ.
Table of contents [Show]
व्हॅल्यू फंड म्हणजे काय? (what is value fund)
व्हॅल्यू फंडमध्ये असा स्टॉक शोधला जातो ज्याची सध्याची किमत ही त्याची फेअर व्हॅल्यू नाही तर अंडर व्हॅल्यू आहे. मात्र फंडामेंटली तो स्टॉक्स चांगला असतो. ज्यामुळे तत्कालीन परिस्थिति बदलून भविष्यात तो स्टॉक पुन्हा चांगली कामगिरी करण्याची शक्यता असते. अशा वेळी तो स्टॉक त्याच्या फेअर व्हॅल्यूपर्यंत पोचला की चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
कॉंट्रा फंड म्हणजे काय? (What is Contra Mutual Fund )
गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करताना contrarian पद्धतीचा अवलंब फंड मॅनेजर्सकडून केला जातो, तेव्हा त्याला कॉंट्रा म्युच्युअल फंड असे म्हणतात. यामध्ये मार्केट ट्रेंडच्या विरोधात गुंतवणूक केली जाते. सध्या चांगली कामगिरी करत नसलेले स्टॉक खरेदी केले जातात. यावेळी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये गुंतवणूकदारांकडून अशा स्टॉकची खरेदी टाळली जाते. त्याच्या विरुद्ध भूमिका या फंडमध्ये घेतली जाते. कामगिरी खालावलेले स्टॉक दीर्घ कालावधीत कामगिरी सुधारून अपेक्षित असलेला उत्तम परतावा देऊ शकतात, हा विचार यामागे असतो.
गुंतवणुकीचे उद्दीष्ट
कॉंट्रा फंड आणि व्हॅल्यू फंड यामध्ये कोणता फंड चांगला आहे याचा निर्णय घेताना यातील फरक आणि साम्य समजून घेणे आवश्यक आहे. (Contra Fund or Value Fund : Which Is Better?) कॉंट्रा फंड अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात ज्यांचा परफॉर्मन्स सध्याच्या स्थितीत खराब आहे पण भविष्यात चांगली कामगिरी करू शकतात. व्हॅल्यू फंड अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात ज्यांचे मूल्य सध्या कमी आहे परंतु अशा समभागांचे भविष्य चांगले आहे.
कॉंट्रा फंडसमधील स्टॉकच्या सध्याच्या कमी परफॉर्मन्सचे कारण राजकीय, आर्थिक किवा सेक्टरल समस्या हे असू शकते. तर गुंतवणूकदारांची थॉट प्रोसिस, मार्केट डेफीसिन्सीज अशी कारणे व्हॅल्यू फंडमधील निवडलेल्या स्टॉक्सची सामान्यपणे असतात.
दोन्हीतही जोखीम मोठी (High Risk in Both)
गुंतवणूक करताना त्यातील जोखीमीचाही विचार करावा लागतो. Contra fund vs value fund या दोन्हीमध्ये जोखीम जास्त आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी या दोन्ही फंडांचा विचार करणे योग्य मानले जाते.
दोन्ही फंडात गुंतवणूकीसाठी संयम महत्वाचा (Patience Important)
दोन्हीमध्ये जोखीम जास्त असल्याने आपल्याला अपेक्षित असलेला परतावा मिळण्यासाठी दीर्घकाळ थांबाबे लागते. यासाठी संयम महत्वाचा आहे. यामुळे कमीत कमी 5 वर्षे इतका कालावधी तरी यात अपेक्षित असलेले रिटर्न मिळवण्यासाठी देणे आवश्यक मानले जाते.
वरकरणी अनेकांना कॉंट्रा फंड आणि व्हॅल्यू फंड हे एकाच प्रकारचे वाटतात. मात्र, त्यांच्या गुंतवणूकीचा अप्रोच वेगळा असतो. सेबीने फंड हाऊससाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की फंड हाऊस एकतर कॉट्रा फंड किवा व्हॅल्यू फंड आपल्या गुंतवणूकदाराना ऑफर करू शकते. दोन्ही एकाच वेळी नाही. या दोन्ही फंडमधील फरक आणि साम्य आपण बघितला. याचा सारासार विचार करून कोणता फंड आपल्यासाठी चांगला आहे ते ठरवणे योग्य आहे. (Contra Fund or Value Fund: Which Is Better?)