2021-22 आर्थिक वर्ष संपायला अवघे 10 दिवस उरले आहेत. 31 मार्चपूर्वी तुम्ही आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. अन्यथा तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत याल.
आधारकार्ड – पॅनकार्ड लिंकिंग
31 मार्च, 2022 पूर्वी आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅनकार्ड अवैध होऊ शकते. तसेच तुम्हाला 10 हजार रूपयांचा दंड ही होऊ शकतो. बॅंकेत खाते उघडण्यासाठी, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी, ITR भरण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता.
31 मार्चपर्यंत टॅक्स रिर्टन भरा
तुम्ही जर अजून तुमचा 2021-22 या वर्षाचा टॅक्स रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. 31 मार्चपर्यंत नवीन किंवा सुधारित टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत सरकारने दिली आहे.
बॅंक KYC अपडेट करा
बॅंकेची KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 होती. पण कोरोनामुळे सरकारने ही तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्हाला बॅंक खात्याची KYC अपडेट करायची आहे.
वेळेत गुंतवणूक करा आणि टॅक्स सवलत मिळवा
2021-22 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स सवलत मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि कर सवलत मिळवा. अन्यथा तुमच्या अधिकच्या उत्पन्नावर सरकार टॅक्स आकारेल.