Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Travel in India: विमान प्रवास आणखी स्वस्त होणार! हवाई सफर सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येणार

indian aviation industry

प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात येत्या काळात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक सुरळीत झाली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतामध्ये विमान प्रवास फक्त उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंताची मक्तेदारी होता. मात्र, आता हे चित्र पालटत असून आता विमान प्रवास सर्वसामान्य व्यक्ती आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येणार आहे. आज बुधवारी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात येत्या काळात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. कोरोनानंतर विमान वाहतूक सुरळीत झाली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उडाण योजनेला बळ (UDAN civil aviation scheme)

नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी एक उडाण योजना असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत सांगितले. या योजनेद्वारे देशभर विमानतळ बांधण्यात येत आहेत. UDAN योजनेचा अर्थ 'उडे देश का आम आदमी' असा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत अनेक नवीन हवाई मार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे एकमेकांना जोडण्यात आली आहेत. देशभरात 59 नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. उडाण योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी नागरिकांनी विमान प्रवास केला आहे.

साडेचार हजार कोटींची मदत( Help to aviation industry)

दुर्लक्षित विमानतळ आणि वाहतुकीचे मार्ग पुन्हा पुनरुज्जिवीत करण्यासाठी सरकारने साडेचार हजार कोटींची मदत देऊ केली आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, राज्य सरकारने आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही सरकारद्वारे मदत करण्यात येत आहे. तसेच 21 ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्यासाठीही सरकारने मंजूरी दिली आहे.

देशांतर्गत जलमार्ग आणि विमान वाहतुकीचा देशात पूर्ण क्षमतेने वापर करण्यात आला नाही, असेही आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. कोरोनंतर हवाई वाहतूक क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे कर्जपुरवठाही विस्कळीत झाला होता. मात्र, भविष्यात सर्वसामान्य नागरिकांनाही विमान प्रवास करता यावा, यासाठी सरकारने प्रयत्न सुरू आहेत.