Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Turmeric Price Fall : हळद उद्योगावर मंदीचे सावट, या कारणांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत हळदीच्या किंमतीत घसरण

turmeric market prices

Turmeric Rates: गेल्या वर्षाच्या तुलनेने देशात हळदीचे (Turmeric) उत्पादन अधिक होताना दिसत आहे.मात्र हळदीच्या किमतीत मोठी घट होतांना आपल्याला दिसत आहे. सरकारी आकडेवारी (Govt Data of Turmeric Rates) बघितली तर या वेळी मंडईंमध्ये हळदीच आवक पूर्वीपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ देशात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मग तरीही बाजारात हळद उद्योगावर मंदीचे सावट का आहे? यावर एक नजर टाकुया.

गेल्या वर्षाच्या तुलनेने देशात हळदीचे उत्पादन अधिक होताना दिसत आहे.मात्र हळदीच्या किमतीत मोठी घट होतांना आपल्याला दिसत आहे. सरकारी आकडेवारी (Govt Data of Turmeric Rates) बघितली तर या वेळी मंडईंमध्ये हळदीच आवक पूर्वीपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ देशात हळदीचे मोठ्या प्रमाणात  उत्पादन झाले आहे. मग तरीही बाजारात हळद उद्योगावर मंदीचे सावट का आहे? यावर एक नजर टाकुया.  

हळदीच्या मागणीत घट (Decline in demand for turmeric)

हळदीची किंमत घसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बाजारपेठेत आता मागणी कमी झाली आहे. वास्तविक, देशात हळदीचे उत्पादन वाढत आहे, परंतु मागणी कमी असल्याने त्याच्या किमतीत घट होताना दिसत आहेत. वर्षभरापूर्वी कोरोना आयुर्वेदिक गुणधर्मामुळे हळदीच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. वाढले होते. हळदीचा काढा  इत्यादीमध्ये वापर केल्याने किंमत वाढण्यास मदत झाली होती.

महाराष्ट्रातही मंदावला व्यवसाय (Business has also slowed down in Maharashtra)

हळद व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या ७ डिसेंबरला महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात हळदीचा किमान दर ५६५० रुपये आणि कमाल ७३०१ रुपये होता. सरासरी 6055 रुपये प्रतिक्विंटल दराची नोंद झाली. तामिळनाडूतील सेलममध्ये हळदीची किमान किंमत 5550 रुपये आणि कमाल 7220 रुपये होती. हळदीच्या सरासरी किंमत 6640 रुपये होती. सालेमच्या अत्तूर मंडीमध्ये, किमान किंमत 4,560 रुपये आणि कमाल 7,790 रुपये होती, तर सरासरी किंमत 6,570 रुपये होती. हळदीच्या दरात ही मोठी घसरण मानली जात आहे.

उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा (Expect an increase in production)

सरकारी आकडेवारीनुसार हळदीच्या उत्पादनात आणखी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. एका अंदाजानुसार, यंदा देशात हळदीचे एकूण उत्पादन १३ लाख ३१ हजार टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हळदीचे उत्पादन केवळ 11 लाख टन होते. उत्पादनात वाढीची अपेक्षा हळद व्यवसायासाठी सकारात्मक बातमी असली तरी बाजारपेठेत मागणीत वाढ झाली पाहिजे.