Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rorr electric naked bike: स्प्लेंडरला टक्कर देण्यासाठी येत आहे, Rorr electric naked इलेक्ट्रिक बाईक

Rorr electric naked bike

Image Source : http://www.rideapart.com/

Rorr electric naked bike: सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) ट्रेंड सुरू आहे. एक स्टार्टअप कंपनी काही दिवसात एक जबरदस्त बाईक बाजारात आणणार आहे. तेही तुम्हाला परवडेल त्या दरात. ही बाईकची हीरो स्प्लेंडरशी (Hero Splendor) स्पर्धा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 Rorr electric naked bike: सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा ट्रेंड सुरू आहे. एक स्टार्टअप कंपनी काही दिवसात एक जबरदस्त बाईक बाजारात आणणार आहे. तेही तुम्हाला परवडेल त्या दरात. ही  बाईकची हीरो स्प्लेंडरशी स्पर्धा करणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी Rorr इलेक्ट्रिक नेकेड बाईक लाँच करत आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही बाईक तुमच्या पर्यंत पोहचणार आहे. कंपनीच्या अहवालानुसार सुमारे 33 कोटी रुपये निधीचे लक्ष्य गाठले आहे. याला आतापर्यंत 17 हजार युनिट्सचे बुकिंगही मिळाले आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते लॉन्च करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

बाइकची किंमत (Price of the bike)

ओबेनने या बाइकची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी म्हणजेच 99999 रुपये निश्चित केली आहे. सुरुवातीला ही बाईक जयपूर, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यासह देशातील नऊ शहरांमध्ये लॉन्च केली जाईल. या बाईकची बरीच चर्चा सुरू आहे. या बाईकची संकल्पना यावर्षी मार्चमध्ये सादर करण्यात आली होती. या बाईकची स्प्लेंडरशी तुलना करण्यामागील कारण म्हणजे तिची किंमत. स्प्लेंडरची ऑन रोड किंमत सुमारे 85 ते 90 हजार रुपये आहे. दुसरीकडे, या बाईकचे डिझाइन आणि लूक उत्कृष्ट आहेत. तरुणांना ते खूप आवडेल. 

एका चार्जमध्ये किती अंतर कापणार? (How far will one charge cover?)

ओबेन रोर ही स्पोर्टी दिसणारी बाइक आहे. किमतीला खूप किफायतशीर आहे. जर त्याची पेट्रोल बाईकशी तुलना केली, तर त्यात 10 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 72Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये पिकअप देखील उत्कृष्ट आहे. हे शून्यावरून 40 किमीचा वेग केवळ तीन सेकंदात पकडते. त्याचा टॉप स्पीड 100 किमी आहे. यात इको, सिटी आणि हॅवॉक असे तीन पॉवर मोड आहेत. बाईकमध्ये 4.4 kWh बॅटरी आहे. हे दोन तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते आणि एका चार्जमध्ये ते 125 किमी अंतर कापू शकते.