Stock Market Closing Bell: सोमवारी 9 जानेवारी रोजी जागतिक बाजारात सकारात्मक चित्र होते. देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या प्रमाणात उसळी घेत बंद झाला. बीएसई सेन्सेक्स (BSE SENSEX) 846.94 अंकांनी वाढून 60 हजार 747.31 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी (NSE NIFTY) 241.75 अंकांनी म्हणजेच 1.35 टक्क्यांनी वाढून 18 हजार 101.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये (Index) माहिती तंत्रज्ञान (IT), पॉवर (Power), ऑटो (Auto), कॅपिटल गुड्स (Capital Goods), ऑइल - गॅस (Oil - Gas), मेटल (Metal)आणि पीएसयू बँक (PSU Bank) आदी इंडेक्स 1 ते 2 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांकात एक टक्का, तर स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.
सेन्सेक्सवर या शेअर्सची मजबूत कामगिरी (Strong performance of these stocks on Sensex)
सोमवारी, महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 3.59 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे एचसीएल टेक 3.37 टक्के, टीसीएस 3.35 टक्के, इंडसइंड बँक 3.06 टक्के, टेक महिंद्रा 2.92 टक्के आणि भारती एअरटेल 2.69 टक्क्यांनी घसरले. याशिवाय विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये झाली घसरण (These shares fell)
सेन्सेक्सवर टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.12 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय बजाज फिनसर्व्ह आणि मारुतीचे शेअर्सही पडले.
दुसरीकडे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी मजबूत होऊन 82.36 वर बंद झाला. मागील सत्रात तो 82.72 च्या पातळीवर बंद झाला होता.
शेअर बाजारातील तेजीचे कारण काय? (reason behind boom in the stock market?)
युएस नोकऱ्यांच्या डेटाच्या प्रकाशनानंतर, युएस फेड रिझव्र्ह (US Federal Reserve) व्याजदर वाढीबाबतची कठोर भूमिका घेणार नाही, या अपेक्षेवर वॉल स्ट्रीट वाढला. त्याच वेळी, आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या चांगल्या निकालांच्या अपेक्षेने आयटी समभागांना बळकटी दिली, ज्याचा परिणाम ब्रॉडर मार्केटवर दिसून आला आहे.