टीसीएस (TCS) या देशातल्या आघाडीच्या माहिती- तंत्रज्ञान कंपनीने (IT Company) आपला सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीतला तिमाही निकाल आज (9 जानेवारी) प्रसिद्ध केलाय. आणि त्यापूर्वीच शेअर बाजारात टीसीएस शेअरला आज उसळी मिळाली.
TCS तिमाही निकालातले महत्त्वाचे मुद्दे
- नेट नफा - टिसीएस कंपनीने सलग दुसऱ्या तिमाहीत 10,000 कोटी रुपयांचा नेट नफा नोंदवला आहे. मात्र यंदा त्यांच्याकडून 11,137 कोटी रुपयांच्या नफ्याची अपेक्षा धरली जात होती. पण, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरलेल्या किमतीचा फटका माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना बसला आहे. टीसीएसचा नेट नफा सप्टेंबर ते डिसेंबर 2022 मध्ये 10,846 कोटी रुपये इतका होता.
- महसूल - कंपनीचा महसूल मात्र आधीच्या तिमाहीच्या तुलनेत 5.3% नी वाढला आहे. ताज्या तिमाही निकालांत 58,229 कोटी रुपये इतक्या महसूलाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिटमध्येही वाढ झाली आहे. आणि महसूलाच्या बाबतीत कंपनीबद्दल वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त वाढ प्रत्यक्ष निकालात दिसत आहे.
- तिमाहीतल्या चांगल्या कामगिरीनंतर टीसीएसने लाभांशही जाहीर केला आहे. प्रत्येक शेअर मागे 8 रुपये अंतरिम लाभांश मिळणार आहे. तर 67 रुपयांचा विशेष लाभांशही जाहीर करण्यात आला आहे.
(Disclaimer : महामनी शेअरविषयीचे गुंतवणुक सल्ले देत नाही. वाचकांनी आपल्या जोखमीवर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करावी.)