Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Closed: एका दिवसात 2 लाख कोटींचे नुकसान, आजही शेअर बाजार गडगडला!

Share Market Closed

Share Market Update: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 17 हजार 850 च्या आसपास बंद झाला.

Stock Market Closing On 6th January 2023: आज, दिनांक 6 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. व्यवसायाच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांनी घसरल्यानंतर बंद झाला आहे. तर निफ्टी 17 हजार 850 च्या आसपास बंद झाला. बाजाराची सुरुवात अतिसामान्य आणि माफक नफा मिळवत झाली होती, पण सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात आल्यानंतर पुन्हा विक्री झाल्याने, सेन्सेक्समध्ये 453 अंकांची घसरण झाली आहे.  59 हजार 900 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 133 अंकांची घसरण झाली असून तो 17 हजार 859 च्या पातळीवर बंद झाला आहे. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांकडून सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

आजच्या व्यवहारात प्रत्येक क्षेत्रात विक्री झाली आहे. निफ्टीवरील फक्त एफएमसीजी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला आहे. बँक, वित्तीय, धातू निर्देशांकात सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी, आयटी निर्देशांकात सुमारे 2 टक्के घसरण झाल्याचे दिसून आले आहे. फार्मा, ऑटो आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांतील निर्देशांकही लाल रंगात बंद झाले.

कोणाचे शेअर वधारले आणि कोणाचे पडले? (Today's Top Gainers, Top Losers)-

मोठ्या शेअर्समध्ये विक्रीचा कल दिसून आला. सेन्सेक्स 30 मधील 25 शेअर लाल रंगात आणि 5 हिरव्या चिन्हात बंद झाले. आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये टीसीएस (TCS), इंडसंड बँक (INDUSIND BANK), बजाज फायनॅन्स (BAJAJ FINANCE), कोटक बँक (KOTAK BANK), इन्फोसिस (Infosys), एअरटेल (Airtel), टाटा मोटर्स (Tata Motors), टायटन (Titan) यांचा समावेश आहे. सर्वाधिक लाभधारकांमध्ये एम अँड एम (M&M), आरटीएल (RIL), आयटीसी (ITC) आणि एलटी (L&T) यांचा समावेश आहे.