IRCTC: IRCTC च्या नवीन टूर पॅकेजसह, तुम्ही उदयपूरमध्ये आणि गोवामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही कमी दरात उदयपूरला भेट देऊ शकता. तलावांच्या या शहरात प्रवासी नवीन वर्ष साजरे करू शकतात. उदयपूर आपल्या सौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरते. ख्रिसमस आणि नवीन वर्ष गृहीत धरून (Christmas special offers) आयआरसीटीसीचे नवीन टूर पॅकेज आहेत. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
IRCTC टूर पॅकेज (IRCTC Tour Package)
IRCTC कडून दोन टुर पॅकेज आहेत. उदयपूर आणि गोवा या दोन्हीमध्ये तुम्ही फूल एंजॉय करू शकता. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही उदयपूर तलावांच्या शहरातील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. पार्टी प्रेमींव्यतिरिक्त, गोवा हे निसर्गप्रेमींसाठी, साहसी प्रेमींसाठी तसेच आरामशीर सुट्टीचा आनंद लुटणाऱ्यांसाठीही उत्तम ठिकाण आहे. तर जाणून घेऊया टुर पॅकेज कधी पासून सुरू हॉट आहे आणि त्याचे चार्ज काय?
उदयपूर टुर पॅकेज (Udaipur Tour Package)
IRCTC चे हे टूर पॅकेज 21 डिसेंबरपासून सुरू होत आहे. हे टूर पॅकेज 2 जानेवारी 2023 पर्यंत चालेल. ज्याची सुरुवात दिल्लीपासून होईल. 'उदयपूर सिटी ऑफ लेक्स टूर पॅकेज' असे या टूर पॅकेजचे नाव आहे. या टूर पॅकेजचा प्रवास ट्रेनमधून होणार आहे. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना सुखडिया सर्कल, सिटी पॅलेस म्युझियम आणि इंडियन फोक आर्ट सर्कल, एकलिंगजी आणि हल्दीघाटी ही ठिकाणे पाहायला मिळतील. यानंतर प्रवासी ट्रेननेच दिल्लीला परततील. या टूर पॅकेजच्या स्लीपर कोचसाठी सिंगल ऑक्युपन्सीवर 6335 रुपये, दोन पर्यटकांसह प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती 5185 रुपये, तीन पर्यटकांसह 5175 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. थर्ड एसीमध्ये प्रवास करण्यासाठी 10885 रुपये सिंगल ऑक्युपन्सी, 9150 रुपये दोन पर्यटकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 9150 रुपये, तीन पर्यटकांसह प्रवास करण्यासाठी 8780 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाईल. या टूर पॅकेजबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, तुम्ही IRCTC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकता.
गोवा टुर पॅकेज (Goa Tour Package)
IRCTC च्या या पॅकेजचे नाव ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे आहे. पॅकेज कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस असा आहेत. संपूर्ण प्रवास फ्लाइटने आहे. कव्हर केलेले स्थळ उत्तर आणि दक्षिण गोवा असे आहे. 22 डिसेंबर 2022 पासून हा टुर सुरू होणार आहे. परतीच्या फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट दिले जाईल. राहण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल. नाश्ता, 4 रात्रीच्या जेवणाची सोय असेल. या पॅकेजमध्ये प्रवास विमा देखील संरक्षित केला जाईल. जर तुम्ही या ट्रिपमध्ये एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 51,00 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती 40,500 रुपये शुल्क भरावे लागेल. तीन लोकांना प्रति व्यक्ती 38,150 रुपये शुल्क भरावे लागेल. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह 32,500 रुपये द्यावे लागतील.
या टुरची संपूर्ण माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.