Republic Day Maharashtra Chitrarath 2023: 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्यपथावर परेड सादर करण्यात येतो. या परेडमध्ये प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन घडवते. यावेळच्या परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला(Maharashtra Chitrarath 2023) दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर उत्तराखंडच्या चित्ररथाला(Uttarakhand Chitrarath 2023) प्रथम क्रमांक मिळाला आहे. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेशच्या(UP Chitrarath 2023) चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
कसा होता महाराष्ट्राचा चित्ररथ?
‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर अधारित चित्ररथ यावर्षी सादर करण्यात आला होता. या चित्ररथाच्या समोरील बाजूस गोंधळी असून त्यांच्याकडे प्रमुख वाद्य संबळ(Sanbal) हे देखील दाखवण्यात आलं होत. हे सर्व तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहे. त्याच्या मागील बाजूस साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा साकारण्यात आला होता. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मानच आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला सादर करण्यात आली होती.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या देवींच्या सुंदर प्रतिमांचे दर्शन कर्तव्यपथापवर झाले आहे.