Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्हाला माहिती आहे का 26 जानेवारी व 15 ऑगस्टला तिंरगा दोन वेगवेगळया पध्दतीने फडकविला जातो

Independence Day and Republic Day Flag Hoisting Difference

Independence Day and Republic Day: खरं..आहे की, आपल्यापैकी बऱ्याचा लोकांना प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) व स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) यातील फरक माहित नसतो. या दोन्ही महत्वाच्या दिवशी ध्वजारोहणदेखील वेगवेगळया पध्दतीने केले जाते, हे देखील माहित नसते. चला, तर मग यातील फरक समजावून घेवुयात.

Independence Day and Republic Day Flag Hoisting Difference: 26 जानेवारी नुकताच साजरा करण्यात आला. पण आपण सर्व एकत्रित येवुन हा दिवस तर मोठया उत्साहाने साजरे करतो. पण आपल्यापैकी काही लोकांना 26 जानेवारी व 15 ऑगस्ट यातील फरकच माहित नसतो. तसेच या दोन्ही महत्वाच्या दिवशी ध्वजारोहणदेखील वेगवेगळया पध्दतीने केले जाते याची माहितीदेखील नसते, हीच महत्वाची माहिती जाणून घेवुयात.

15 ऑगस्टनिमित्त कसा फडकवितात तिरंगा 

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) आपण सर्वजण एकत्रित येऊन हा दिवस साजरा करतो. तसेच शाळा, चौक व विविध शासकीय कार्यालये येथे तिरंगा फडकविला जातो. हा तिरंगा स्वातंत्र्यदिनानिमित्त दोरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेन खेचून घेतात, मग तो प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेचून उघडला जातो. स्वातंत्र्यदिनानिमित्त जे झेंडावंदन केले जाते त्याला ‘ध्वजारोहण’ असे म्हटले जाते. 

26 जानेवारीनिमित्त कसा फडविला जातो तिरंगा

26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन (Republic Day) नुकताच साजरा करण्यात आला. हा देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन होता. प्रजासत्ताक दिनी तिरंगा स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो व त्यामध्ये फुले टाकून झेंडा फडविला जातो. तसेच या दिवशी ध्वजारोहण न म्हणता ‘ध्वज फडकविला’ असे म्हणतात. या छोटया गोष्टी व फरक आहेत पण सहसा कोणाला ही माहिती नसतो. 

15 ऑगस्ट व 26 जानेवारी साजरा करण्यामागील कारण

15 ऑगस्टला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणजेच ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यामुळे 15 ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून साजरा करतात. तर 26 जानेवारीला भारतीय संविधान अमलात आणले गेले म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी लिहिलेली राज्यघटना अमलात आली. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतात. संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे की, जो दोन राष्ट्रीय सण साजरे करतो.