Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anand Mahindra Net Worth: जाणून घ्या अब्जाधीश असलेले आनंद महिंद्रा यांची संपत्ती!

Anand Mahindra

Image Source : www.forbesindia.com

Anand Mahindra:भारतात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी केवळ आपल्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला आहे. असेच एक उद्योगपती म्हणजे आनंद महिंद्रा, ज्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते.भारतातील सर्वात श्रीमंत (2022) व्यक्तींच्या यादीत आनंद महिंद्रा हे 19 व्या स्थानावर आहेत. तसेच फोर्ब्सच्या 2022 च्या अब्जाधीशांच्या यादीत ते 1729 व्या क्रमांकावर आहेत.

Anand Mahindra in Forbes List: आनंद महिंद्रा यांनी आपल्या देशाला फार्म ट्रॅक्टरपासून ते एरोस्पेसपर्यंत, थिएटरपासून माहिती तंत्रज्ञान सेवांपर्यंत खूप काही दिले आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक, आनंद महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. आज या लेखात आपण आनंद महिंद्रा यांची एकूण संपत्ती, घर, कार संग्रह आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

67 वर्षीय आनंद महिंद्राची एकूण संपत्ती USD 2.2 अब्ज इतकी आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 14500 कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. तसेच, गेल्या वर्षांत महिंद्राच्या एकूण मालमत्तेत 1.77% घट झाल्याचेही दिसून आले आहे. गेल्या वर्षात त्यांना 34 मिलियन डॉलरचा तोटा झाल्याचे फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) च्या बोर्डावरही त्यांची नियुक्ती झाली आहे. ते USIBC च्या धोरण अग्रक्रमांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि सदस्यांना आणि USIBC च्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर सल्ला देत असतात. भारतातील सर्वात श्रीमंत (2022) व्यक्तींच्या यादीत आनंद महिंद्रा हे 19 व्या स्थानावर आहेत. तसेच फोर्ब्सच्या 2022 च्या अब्जाधीशांच्या यादीत ते 1729 व्या क्रमांकावर आहेत.

महिंद्रा 'नन्ही कली' ही ना-नफा संस्था (Non Profit Organization) देखील चालवतात, जी त्याच्या वडिलांनी 1996 मध्ये सुरू केली होती. याशिवाय 19 वेगवेगळ्या एनजीओसोबत ते सध्या काम करत आहेत. आनंद महिंद्रा मुंबईत राहतात. 2012 मध्ये त्यांनी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले होते. त्यांच्या या घराची किंमत जवळपास 273 कोटी इतकी आहे. याशिवाय त्यांची देश-विदेशात अनेक घरे आणि फार्महाऊस आहेत. आनंद महिंद्रा यांच्याकडे कारचे मोठे कलेक्शन आहे ज्यात जगातील काही सर्वोत्कृष्ट लक्झरी कारचा समावेश आहे. महिंद्रा यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, महिंद्रा, ऑडी, रोल्स रॉयस आणि जग्वार सारख्या महागड्या गाड्या आहेत.

आनंद यांच्या पत्नीचे नाव अनुराधा असून त्या पेशाने पत्रकार होत्या, काही काळ त्या 'व्हर्व' या मासिकाचे काम देखील सांभाळत होत्या. त्या  सध्या 'व्हर्व्ह आणि मॅन्स' या वर्ल्ड मासिकाच्या संपादक आहेत. आनंद आणि अनुराधा महिंद्रा यांना दोन मुली असून त्यांची नावे दिव्या आणि अलिका अशी आहेत.खरं तर, ही गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करते की एवढं मोठं व्यक्तिमत्त्व असूनही आनंद महिंद्रा हे स्वतःचा नाश्ता स्वतःच बनवणं पसंत करतात. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

महिंद्रा हे एक चांगले फोटोग्राफर देखील आहेत आणि त्यांना चित्रपटांमध्ये खूप रस आहे. त्याला 'ब्लूज' ऐकायला देखील आवडते आणि 2011 पासून मुंबईत दरवर्षी आयोजित 'महिंद्रा ब्लूज फेस्टिव्हल' आयोजित केला जातो. ब्लूज फेस्टिव्हलमध्ये पॉप, जाझ,पारंपरिक आणि शास्त्रीय अशा सर्व गायन प्रकाराचे सादरीकरण केले जाते. देशविदेशातील कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात.

भारतात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी केवळ आपल्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला नाही तर आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून भारताच्या विकासात योगदान दिले आहे. असेच एक उद्योगपती म्हणजे आनंद महिंद्रा, ज्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते. आनंद महिंद्रा हे 'महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि दररोज काहीतरी नवनवीन माहिती शेअर करत असतात. याशिवाय लोक आनंद महिंद्रा यांना अडचणीच्या काळात मदत करणारा भला माणूस म्हणूनही ओळखतात. गरजू लोकांची मदत करण्यात ते कधीही मागे हटत नाहीत.

आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत परंतु ते म्हणतात की ते कधीही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार नाहीत कारण तसे बनण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. एका ट्विटर वापरकर्त्याने महिंद्रा यांनी विचारले होते की, “तुम्ही भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी शीर्षस्थानी याल". त्यावर उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी हिंदीत लिहिले, "सत्य हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही. कारण ही माझी इच्छा कधीच नव्हती."