Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Option for Investment: एफडी, गोल्ड की स्टॉक मार्केट? कोणता ऑप्शन ठरेल फायद्याचा?

Best Investment Plan

सामान्य गुंतवणूकदार हे मोठ्या काटकसरीने पैशाची बचत करत असतात आणि भविष्यातील सोय म्हणून आपले पैसे वेगेवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये लावत असतात. त्यामुळे देशातील आणि जागतिक पातळीवर होत असलेल्या आर्थिक उलाढाल लक्षात घेता कुठे गुंतवणूक करावी याविषयी थोडेसे जाणून घेऊया.

सध्या जगभरात आर्थिक मंदीचं सावट दिसतयं. अमेरिका, जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्ये मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आशिया खंडातील देश आणि आपले शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका हे देखील आर्थिक तंगीतून जात आहेत. जगभरात कमी जास्त प्रमाणात असंच चित्र दिसते आहे. अशात भारताची आर्थिक परिस्थिती मात्र नियंत्रणात आल्याचे चित्र दिसते आहे.

सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ आणि ठोक वस्तूंच्या किमती आता नियंत्रणात आल्या आहे. याचाच परिणाम म्हणून आरबीआयने पतधोरण बैठकीत रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. महागाई नियंत्रणात राहिली आणि देशाची आर्थिक स्थिती उत्तम राहिली तर पुढील पतधोरण बैठकीत रेपो रेट कमी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशातच सामान्य ग्राहक, सामान्य गुंतवणुकदार म्हणून आपल्या सर्वांना प्रश्न पडतो, की अशा काळात आपण गुंतवणूक नेमकी कुठे केली पाहिजे? सामान्य गुंतवणूकदार हे मोठ्या काटकसरीने पैशाची बचत करत असतात आणि भविष्यातील सोय म्हणून आपले पैसे वेगेवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये लावत असतात. त्यामुळे देशातील आणि जागतिक पातळीवर होत असलेल्या आर्थिक उलाढाल लक्षात घेता कुठे गुंतवणूक करावी याविषयी थोडेसे जाणून घेऊया.

1. मुदत ठेव 

FD म्हणजेच मुदत ठेव. एका विशिष्ट कालावधीसाठी आपण आपली बचतीची रक्कम बँकेत गुंतवत असतो. गुंतवलेल्या रकमेवर आपल्याला विशिष्ट व्याजदराने परतावा मिळतो. सध्याच्या काळात FD हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय ठरू शकतो. गेल्या 1 वर्षात उच्च चलनवाढीमुळे RBI ने व्याजदर 4% वरून 6.5% पर्यंत वाढवले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सध्या देशभरातील सर्वच बँका मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर देत आहेत.

एक लक्षात असून द्या सध्या देशातील महागाईचा दर गेल्या 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे आणि RBI च्या अपेक्षित मर्यादेत देखील आहे म्हणूनच RBI पुढील काही काळ व्याजदर वाढवणार नाहीये असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु भविष्यात व्याजदरात कपात देखील होऊ शकते. म्हणून जाणकारांनी शिफारस केली आहे की जर तुम्ही FD करण्याचा विचार करत असाल तर ही गुंतवणुकीची सर्वोत्तम वेळ आहे!

2. स्टॉक मार्केट 

गेली काही वर्षे स्टॉक मार्केट सर्वसामान्यांचा गुंतवणुकीचा पर्याय नाही असा एक समज होता. मात्र आता लोक याबाबत देखील शिक्षित झाले आहेत. शेअर मार्केटचा अभ्यास करून अनेक गुंतवणूकदार स्मार्ट गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. निफ्टी, सेन्सेक्स सारख्या शेअर बाजाराचा निर्देशांक नेहमीच उच्च असतो. याचा परिणाम देशातील महागाई आणि व्याजदरांवर देखील पहायला मिळतो.

संयम ठेवून जर गुंतवणुकीचा हा पर्याय जर तुम्ही स्वीकारला तर तुम्ही फायद्यात राहू शकता. तुम्हाला ठाऊक असेल की रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान खाद्यान्न, पेट्रोल-डीझेलच्या किमती वाढल्या होत्या, मात्र आता युध्द मंदावल्यानंतर या वस्तूंच्या किमती घसरल्या आहेत. याचा फायदा भारतासारख्या विकसनशील आणि आयातदार देशांना झालेला पहायला मिळतो.

म्हणजेच संयम ठेऊन जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. गेल्या 1 वर्षापासून भारतीय बँकिंग प्रणाली देखील चांगली कामगिरी करत आहे, कारण उच्च व्याजदरानंतरही लोक बँकांकडून कर्ज घेत असल्याचे पाहायला मिळते आहे. एकंदरीत जर विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या चांगली वेळ मानली जाते आहे!

3. सोने

सोने म्हणजे युनिव्हर्सल करन्सी, म्हणजेच जागतिक चलन. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 5-10% गुंतवणूक ही सोन्यात असायला हवी असे जाणकार म्हणतात. तसं पहायला गेलं तर भारतीय संस्कृतीत सोने खरेदीला मोठी मागणी असते आणि ती एक गुंतवणूक म्हणूनही बघितली जाते. आजवर वाढत्या महागाईच्या तुलनेत सोन्याचे भाव देखील वाढलेले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कधीही नुकसान सहन करावे लागलेले नाहीये.

सध्या सॉवरेन गोल्ड बाँड, डिजिटल गोल्ड, गोल्ड SIP असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता.

म्हणजेच काय तर आरबीआयने व्याजदर वाढवलेले आहेत. एफडी, सोने आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची ही खरोखरच उत्तम वेळ आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की हे स्पष्ट संकेत आहे की भविष्यात व्याजदरात कपात होऊ शकते. तेव्हा हे तिन्ही पर्याय गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

टीप: हा लेख केवळ माहिती देण्यासाठी आम्ही देत आहोत, यात तुम्हाला गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात नाही. मार्केटचा अभ्यास करून आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच गुंतवणुकीचा पर्याय ठरवावा.