एअर इंडिया कंपनी एअरलाईनचे आधुनिकीकरण करण्यासाठी ChatGPT चॅटबॉटचा वापर करणार आहे. यासाठी सुरुवातीला कंपनी 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनी ChatGPTच्या माध्यमातून नवीन डिजिटल प्रणाली, डिजिटल अभियांत्रिकी सेवा आणि डिजिटल सिस्टिम उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून ग्राहकांना अधिकाधिक चांगल्यो सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
Table of contents [Show]
एअर इंडिया नव्या रूपात
टाटा समूहाने एअर इंडियाचे हक्क मिळवल्यानंतर कंपनीचे आरमार नव्याने उभरण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. या अंतर्गत एअर इंडियाला पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाची विमान कंपनी बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. यासाठी कंपनी सतत नवनवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. Vihaan.AI अंतर्गत बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याचेही एअरलाइनचे उद्दिष्ट आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर
अलीकडच्या काळात ग्राहकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एअरलाईन नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहे. यामध्ये वेबसाईट आणि मोबाइल अॅप, ChatGPT चा वापर, इन-फ्लाईट मनोरंजनाची उपकरणे आणि रिअल-टाईम कस्टमर प्रॉब्लेम ट्रॅकिंगवर भर देणार आहे.
एअर इंडियाची 840 विमानांची ऑर्डर
एअर इंडिया कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेली नवीन विमाने खरेदी करणार आहे. फेब्रुवारीमध्ये एअरलाईनने 840 विमानांची ऑर्डर दिली होती. त्यापैकी 250 विमानांची ऑर्डर फ्रेंच कंपनी एअरबसला दिली आहे आणि 220 विमानांची ऑर्डर अमेरिकन कंपनी बोईंगला मिळाली आहे. यासोबतच 370 विमानांच्या अतिरिक्त खरेदीचा पर्यायही देण्यात आला आहे. एअर इंडियाने दिलेली ही ऑर्डर विमानाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मानली जाते.
कर्मचारी सक्षमीकरणासाठी कंपनी उचलणार पाऊल
एअर एडिया कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नवे डिजिटल पाऊल उचलणार आहे. कर्मचारी सुविधेसाठी एअरलाईन कर्मचारी सर्व्हिस पोर्टल, पायलट, केबिन क्रू, ऑपरेशन क्रूच्या मदतीसाठी नवीन प्रणाली तैनात करण्यात येणार आहे. व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून एअरलाइन येत्या काळात योजना लाँच करणार आहे.
Source: www.jagran.com