Personal Loan: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या सॉफ्टवेअर्सची सगळीकडे चर्चा सुरू आहे. अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. चॅट जीपीटी टूलने तर बाजारात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंतचे सर्वात स्मार्च AI टूल म्हणून Chat GPT कडे पाहिले जाते. हे टूल तुम्हाला पर्सनल लोन घेताना मदत करू शकते.
चॅट जीपीटीला विचारा प्रश्न
अपडेटेड व्हर्जन GPT-4 हे सर्वाधिक चांगले AI टूल असून विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे मिळतात. (Chat GPT help in getting loan) तुम्ही वैयक्तिक कर्ज घेताना बँक ऑफर, व्याजदर, शुल्क, कागदपत्रे अशी माहिती चॅट जीपीटी-4 ला विचारू शकता. पाहूया चॅट जीपीटीद्वारे कोणत्या गोष्टींसाठी मदत होईल.
बँक लोन घेण्याचे पर्याय?
पर्सनल लोन घ्यायचे असेल तर विविध लोनच्या ऑफर इंटरनेटवर चेक कराव्या लागतात. मात्र, एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व ऑफरची माहिती मिळणार नाही, बँका आणि वित्तसंस्था मिळून शेकडो पर्याय तुमच्यापुढे असतील ही प्रक्रिया वेळखाऊ असेल. मात्र, चॅटजीपीटी तुम्हाला निवडक लोन ऑफर दाखवू शकतो. व्याजदर, कागदपत्रे कोणती लागतात, शुल्क, कर्जफेड कालावधी अशी माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे विविध ऑफर्सची तुलना करायला सोपे जाईल.
वैयक्तिक सल्ला
चॅटजीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्ता टूल असल्याने ते तुम्हाला पर्सनलाइज्ड (वैयक्तिकृत) उत्तर देऊ शकते. तुमच्या गरजेला मिळतीजुळती लोन ऑफर चॅट जीपीटी सुचवू शकतो. तुमचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर विचारात घेऊन चॅट जीपीटी तुम्हाला योग्य बँक ऑफर दाखवेल.
शंका आणि कर्जासंबंधी प्रश्नांची उत्तरे चुटकीसारखी मिळवा
कर्ज घेण्याची प्रक्रिया आणि नियम किचकट असू शकतात. तुम्हाला जर लोनसंबंधी काही शंका असतील तर त्याचे नेमके उत्तर चॅटजीपीटी टूल देऊ शकतो. ही उत्तरे किचकट बँकेच्या भाषेत नाही तर सोप्या भाषेत तुम्हाला समजतील अशी मिळतील.
भविष्यात काय होईल याचे विश्लेषण
चॅट जीपीटी टूलमध्ये जुनी माहिती मोठ्या प्रमाणात स्टोअर केलेली आहे. या माहितीचा अभ्यास करून भविष्यात काय होऊ शकते याचा अंदाज हे टूल बांधू शकते. त्यामुळे तुम्हाला कर्ज मंजूर होईल की नाही, व्याजदर वाढू शकतो का? तसेच कर्जाचे हप्ते चुकल्यास किती दंड लागू शकतो, त्यात वाढ किती होऊ शकते अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चॅट जीपीटीकडून सहज मिळू शकतात.
चॅट जीपीटी 4 मोफत आहे का?
चॅट जीपीटीचे GPT 3.5 हे व्हर्जन मोफत उपलब्ध आहे. मात्र, जर तुम्हाला Chat GPT - 4 वापरायचे असेल तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागले. प्रति महिना 20 डॉलर म्हणजेच सुमारे 1600 रुपये शुल्क आकारले जाईल. हे व्हर्जन लेटेस्ट अपडेटेड असून याद्वारे जास्त अचूक उत्तरे मिळतात.
दरम्यान, चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल असल्याने याने दिलेली उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. ही उत्तरे तुम्ही त्या बँक किंवा वित्तसंस्थेशी संपर्क साधून खात्री करून घेऊ शकता. मात्र, प्राथमिक स्तरावर चॅट जीपीटीची माहिती शोधण्यास मदत होऊ शकते.