Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Fraud Case: चंदा कोचर यांना पतीसह अटक, 3 हजार कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याचे काय होते हे प्रकरण ते घ्या जाणून

Loan Fraud Case

Image Source : www.indiatimes.com

Loan Fraud Case : आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI) माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

 आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI) माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांची नावे न्यू पॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडसह गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांतर्गत एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदवली आहेत.

व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी कथितरित्या न्यूपॉवरमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर एका निवेदनात म्हटले होते की, आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटात खाजगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) यापूर्वी 3 हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर चंदा कोचर यांना 2018 मध्ये आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. कोचर यांना  सीबीआयने फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

ED कडून सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक 

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा फौजदारी गुन्हा नोंदवून ईडीने सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील ICICI बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि कर्ज मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने 8 सप्टेंबर 2009 रोजी NuPower Renewables Pvt Ltd ला 64 कोटी रुपये वितरित केले. (NRPL). दीपक कोचर हे एनआरपीएलचे मालक होते.